दारू घोटाळ्यात तपासासाठी सीबीआय, ईडीचे समन्स आले; तेलंगणाच्या मुख्यमंत्री कन्येला महिला आरक्षण बिल आठवले!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीतील दारू घोटाळ्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआय पाठोपाठ ईडीने देखील अटक केली. त्याचवेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आमदार के. कविता यांना चौकशी आणि तपासासाठी समन्स पाठवले. पण हे समन्स येताच के. कविता यांना महिला आरक्षण बिल आठवले!! त्यांनी नवी दिल्लीत येऊन जंतर-मंतरवर संसदेत महिला आरक्षण बिल मांडण्यासाठी उपोषण आरंभले आहे.CBI, ED summoned for probe in liquor scam; Telangana Chief Minister Kanye remembers the Women’s Reservation Bill!!

दिल्लीतील दारू घोटाळ्याच्या तारा फक्त दिल्लीतच उरल्या नसून त्या देशभर पसरल्याचे हळूहळू स्पष्ट होत आहे. त्यातूनच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि तेलंगण विधानसभेच्या विधान परिषदेच्या सदस्य आमदार के. कविता यांना सीबीआयने चौकशी आणि तपासासाठी समन्स पाठवले. आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, असे कविता यांनी जरूर सांगितले. पण त्याचवेळी त्यांना संसदेत बरीच वर्षे प्रलंबित असलेले महिला आरक्षण बिल आठवले आहे.



वास्तविक के. कविता या तेलंगण राष्ट्र समितीच्या राज्यसभेच्या खासदार होत्या. पण तेव्हा महिला आरक्षण या विषयावर त्यांनी कधी खासगी बिल आणले नाही. आता त्या जेव्हा तेलंगण विधान परिषदेच्या सदस्य आहेत, तेव्हा मात्र त्यांना तेलंगण विधान परिषदेत नव्हे तर, संसदेत महिला आरक्षण बिल पेश करावे असे वाटू लागले आहे!! त्यामुळेच त्यांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर महिला आरक्षण बिल या विषयावर उपोषण सुरू केले आहे.

तेलंगण राष्ट्र समितीचे रूपांतर चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समितीत आधीच केले आहे. नवी दिल्लीत पक्षाचे मोठे कार्यालयही उघडले आहे. दारू घोटाळ्यात समन्स आल्यानंतर तसेही के कविता यांना चौकशी आणि तपासाला वारंवार सामोरे जावे लागणारच आहे. या पार्श्वभूमीवर महिला आरक्षण बिल यासारख्या भावनिक मुद्द्याला हात घालून कविता यांनी भारत राष्ट्र समितीचे कॅम्पेनही करून घेण्याचा मनसूबा आखला आहे.

तेलंगण राष्ट्र समिती तेलंगणामध्ये 9 वर्षे सत्तेवर आहे. संसदेत जसे महिला आरक्षण नाही, तसेच तेलंगणातही महिला आरक्षण नाही. परंतु स्वतःच्या राज्यात महिला आरक्षण बिल आणावे यासाठी मुख्यमंत्री कन्या के. कविता उपोषण करत नाहीत, तर संसदेत ते बिल मांडावे यासाठी त्या उपोषणाला बसल्या आहेत.

मोदींविरोधात आंदोलन करण्याची हिम्मत दाखवावी, तेलंगण काँग्रेसचे आव्हान

के. कविता यांचे दिल्लीतले उपोषण हे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे स्क्रिप्टेड नाटक आहे. महिला सन्मान, महिला आरक्षण याविषयी त्यांना काही देणे घेणे नाही. दारू घोटाळ्यात समन्स झाल्यानंतर चौकशीला सामोरे जाण्याऐवजी कविता उपोषणाला बसल्या आहेत. पण चंद्रशेखर राव आणि कविता यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आदानी यांच्या विरोधात आंदोलन करण्याची हिंमत नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मोदी – अदानी विरोधात आंदोलन करून दाखवावे, असे आव्हान तेलंगण प्रदेश काँग्रेस अध्यक्ष के. रेवंत यांनी दिले आहे.

CBI, ED summoned for probe in liquor scam; Telangana Chief Minister Kanye remembers the Women’s Reservation Bill!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात