विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची चहूबाजूंनी कोंडी झाली असताना राहुल गांधींना भाजप विरुद्ध प्रचंड संताप आलाय, पण त्यांनी त्याची ED आणि CBI वर भडास काढली.CBI, ED should think … ‘: Rahul Gandhi warns probe agencies of ‘strong action’ whenever BJP government changes
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काँग्रेस पक्षाकडे तब्बल 1823.3 कोटींची वसुली काढली. तशी नोटीस पक्षाला पाठवली. काँग्रेसने इन्कम टॅक्स कसा आणि केव्हा थकवला??, ती रक्कम किती होती??, याचे सगळे तपशील त्या नोटीशीमध्ये दिले. त्यामुळे काँग्रेसचीपुरती राजकीय आणि आर्थिक कोंडी झाली. त्या मुद्द्यावर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश आणि खजिनदार अजय माकन यांनी सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वर शरसंधान साधले होते, पण त्याचबरोबर काँग्रेसला जर केवळ 14 लाखांच्या थकबाकी साठी 1823 कोटी रुपयांची दंड आणि व्याजाची नोटीस काढणार असाल, तर भाजपने 42 कोटी रुपये थकबाकी ठेवली आहे. त्यामुळे त्यांना तर 4600 कोटी रुपयांची दंड आणि व्याजाची नोटीस पाठवली पाहिजे. पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तसे केले नाही. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पक्षपाती आहे, असा आरोप केला होता.
पण त्यापुढे जाऊन राहुल गांधींनी आज केंद्रातल्या मोदी सरकार वरचा सगळा संताप केंद्रीय तपास संस्था CBI आणि ED यांच्यावर काढला. या दोन्ही तपास संस्थांनी कायद्याच्या चौकटीत राहून योग्य काम केले असते, तर त्यांना काही प्रॉब्लेम आला नसता, पण या संस्था भाजप सरकारच्या बटीक असल्यासारखे काम करतात. या संस्थांमधल्या अधिकाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, भाजपचे सरकार केंद्रात कायमचे राहणार नाही. त्यामुळे मी याची गॅरंटी देतो की, केंद्रातले सरकार बदलले की ED आणि CBI मधल्या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध आमचे केंद्र सरकार अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करेल, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकार वरची सगळी भडास केंद्रीय तपास संस्थांवर काढली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App