विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भास्कर समुहाने सुमारे २२०० कोटी रुपयांचे बनावट व्यवहार केले आहेत. दैनिक भास्करच्या विविध कार्यालयांवर छापे घातल्यानंतर केलेल्या तपासणीनंतर केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) ही माहिती दिली आहे.CBDT cracks down on Bhaskar group: Fake transactions worth Rs 2,200 crore, more than 100 companies for money laundering
भास्कर समुहाच्या एकूण १०० कंपन्या असल्याचे दिसून आले असून त्यातील अनेक कर्मचाऱ्यांच्याच नावावर आहेत. मात्र, या कंपन्यांचे उद्योग मालक असलेल्या या कर्मचाऱ्यांनाच माहिती सीबीडीटीने दिलेल्या माहितीनुसार, भास्करच्या भोपाळ, इंदूर, दिल्ली, अहमदाबाद, नोएडा आणि इतर काही नऊ शहरांमध्ये २२ जुलैपासून छापे घालून तपासणी सुरू केली आहे.
या शोध मोहिमेदरम्यान सापडलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आले. भास्कर समुहाची वार्षिक उलाढाल सहा हजार कोटी रुपयांची आहे. यामध्ये माध्यम, वीज, वस्त्रोद्योग आणि रिअल इस्टेट अशा विविध व्यवसाय क्षेत्रांम्चा समावेश आहे. या सगळ्या व्यवसायांत मिळून आत्तापर्यंत २२०० कोटी रुपयांचे हस्तातरण झाले आहेत.
मात्र, चौकशीदरम्यान पुढे आले आहे की, या कंपन्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या वस्तू वितरणाशिवाय काल्पनिक व्यवहार झाले आहे. त्यामध्ये कर आणि इतर कायद्यांचे उल्लंघन करण्यात आले आहे.
सीबीडीटीच्या निवेदनात म्हटले आहे की या भास्कर समुहात होल्डिंग आणि सहाय्यक कंपन्या मिळून 100 हून अधिक कंपन्या आहेत. त्यातील अनेक कंपन्या या कर्मचाऱ्यांच्या नावाने नोंदविल्या आहेत. या कंपन्या आणि कर्मचाºयांचा वापर बोगस खर्च दाखविण्यासाठी करण्यात आला आहे.
या माध्यमातून पैसे दुसरीकडे वळविण्यात आले आहेत. त्याचबरोबर अनेक कर्मचाऱ्याची नावे भागधारक आणि संचालक म्हणून वापरली आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांना या कंपन्यांविषयी माहिती नाही.
त्यांनी मोठ्या विश्वासाने भास्करच्या व्यवस्थापनाला आपले आधार कार्ड आणि डिजीटल स्वाक्षरी दिली होती. त्याचबरोबर भास्कर सुमहाचे मालक अग्रवाल कुटंबियांच्या नातेवाईकांच्या नावावर आहेत. त्यांनी स्वत:हून कागदपत्रांवर कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती. परंतु या कंपन्यांकडून काय व्यवसाय केला जातो याची माहितीच त्यांना नाही.
भास्कर समुहाने बोगस कंपन्यांचा वापर करून अनेक बोगस खर्च दाखविले. त्याचबरोबर शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांचा नफा यांनी इतरत्र वळविण्यासाठी सायफनिंग केले. गेल्या सहा वर्षांत भास्कर समुहाने या हिच मोडस आॅपरेंडी वापरून सुमारे ७०० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे.
कर विभाग या प्रकरणातील सूचीबद्ध कंपन्यांसाठी सेबीने विहित केलेल्या लिस्टिंग कराराच्या कंपनी अॅक्टच्या काही कलम आणि कलम 49 च्या उल्लंघनाची चौकशी करीत आहे. बेनामी व्यवहार प्रोहिबिशन कायद्याच्या उल्लंघनाचीही चौकशी होत आहे.
सीबीडीटीने सांगितले आहे की, भास्कर ग्रुपची रिअल इस्टेट कंपनी एक मॉल चालवित आहे. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेकडून ५९७ कोटी रुपयांची मुदत कर्ज मंजूर करण्यात आले आहे.यापैकी 408 कोटी रूपयांची रक्कम एक टक्का कमी व्याज दराने कर्ज म्हणून ग्रुपमधीलच कंपनीला देण्यात आले आहे.
रिअल इस्टेट कंपनी आपल्या करपात्र नफ्यावरील व्याज खचार्चा दावा करीत असली तरी होल्डिंग कंपनीच्या वैयक्तिक गुंतवणूकीसाठी हा नफा कमाविण्यात आला आहे.
भास्कर समुहाची शेअर बाजारात नोंदणीकृत कंपनी महसूल मिळविण्यासाठी जाहिरातींद्वारे महसूल मिळविण्यासाठी बार्टर करते. त्यामध्ये पैशाऐवजी मालमत्ता उदाहरणार्थ फ्लॅट मिळतात. या मालमत्तांच्या विक्रीच्या पावत्या सीबीडीटीला सापडल्या आहेत.
भास्कर ग्रुपच्या रिअल इस्टेट कंपनीने फ्लॅटची विक्री करताना रोख पैशांचाही व्यवहार केला असल्याचे पुरावे सीबीडीटीच्या छाप्यात सापडले आहेत. याबाबत दोन कर्मचारी आणि कंपनीच्या संचालकांनी कबुलीजबाबही दिला आहे.
हत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App