विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना आणि रक्तगट यांचाही संबंध असल्याचे दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमधील एका अभ्यासात आढळून आले आहे. ए, बी आणि आरएच पॉझिटिव्ह असलेल्या रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा धोका जास्त असतो. मात्र, एबी, ओ आणि आरएच निगेटिव्ह असणाऱ्यांना तुलनेने कमी धोका आहे.Caution, people of this blood group have a higher risk of corona
मात्र, रक्तगट आणि रोगाची तीव्रता आणि मृत्यूचे प्रमाण यांच्यात कोणताही संबंध आढळला नाही.गंगाराम हॉस्पीटलमध्ये 8 एप्रिल 2020 ते 4 आॅक्टोबर 2020 या कालावधीत रुग्णालयात दाखल झालेल्या 2,586 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला.
फ्रंटियर्स इन सेल्युलर अँड इन्फेक्शन मायक्रोबायोलॉजीच्या 21 नोव्हेंबरच्या अंकात हे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले. गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम कोरोनाव्हायरस 2 हा एक नवीन विषाणू आहे. आम्ही या अभ्यासात कोविड-19 ची संवेदनशीलता, रोगनिदान, मृत्यूचे प्रमाण संबंध तपासला, असे संशोधन विभागाच्या सल्लागार डॉ. रश्मी राणा यांनी सांगितले.
ए रुक्तगट असलेल्या रुग्णांचे प्रमाण 29.93%, बी रक्तगटाचे 41.8%, ओ रक्तगटासाठी 21.19% आणि एबी रक्तगटामध्ये 7.89% होते. आरएच निगेटिव्ह असलेल्या रुग्णांचे प्रमाण 98.07%होते.संशोधनात असेही आढळून आले आहे
की समान रक्तगट असलेल्या महिला रूग्णांपेक्षा तोच रक्तगट असलेल्या पुरुष रूग्णांमध्ये कोविड-19 ची शक्यता जास्त असते. एबी रक्तगट असलेल्या 60 वर्षे वयोगटातील रूग्णांमध्ये संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते, असेही आढळून आल्याचे रक्त संक्रमण विभागाचे डॉ. विवेक रंजन यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App