प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गोवा उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात आज मतदान सुरू असताना भाजपने आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच मतदान करणार्या युवक युवतींवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.
या संदर्भातली जाहिरात भाजपने ट्विट केली आहे. “तुमचे पहिले मतदान भविष्यासाठी महत्त्वाचे”, अशी त्यासाठी टॅगलाईन देण्यात आली आहे. यामध्ये युवक आणि युवती आपण पहिल्यांदा कशासाठी मतदान करणार आहोत? तर उत्तर प्रदेशातील सुरक्षितता, रोजगार, नव्या आशा आकांक्षा यासाठी आपण मतदान करणार आहोत, असे सांगताना दिसत आहे.
उत्तर प्रदेशातील 55 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत 27% मतदान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने मतदानाचा वेग आणखी वाढवण्यासाठी तसेच युवक मतदारांना आकर्षित करण्यासाठी संबंधित जाहिरात रिलीज केली आहे.
Your first vote is important… pic.twitter.com/ncGzllyLml — Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) February 14, 2022
Your first vote is important… pic.twitter.com/ncGzllyLml
— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) February 14, 2022
या जाहिरातीत हिजाब जात-पात अथवा अन्य कोणत्याही वादग्रस्त मुद्द्यांचा उल्लेख नसून जास्तीत जास्त सकारात्मक बाबींचा उल्लेख यात करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच रोजगार, सुरक्षितता, नव्या आशा-आकांक्षा साठी आपण मतदान करणार असल्याचे युवक – युवती या जाहिरातीत सांगताना दिसत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App