यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचं केलं होतं विधान
विशेष प्रतिनिधी
चंदीगढ : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार स्पर्धा आहे. मात्र, आम आदमी पक्षासाठी वाईट बातमी समोर आली. आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध हरियाणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. , ‘यमुनेचे पाणी विषारी बनवल्याच्या’ विधानाबद्दल अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध हा खटला दाखल करण्यात आला आहे.
हरियाणातील शाहबाद पोलिस ठाण्यात अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जगमोहन मनचंदा नावाच्या व्यक्तीने केजरीवाल यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा यमुना नदीच्या पाण्यात विष मिसळत असल्याबद्दल विधान केले होते. आता, पोलिसांनी केजरीवाल यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम १९२, १९६(१), १९७(१), २४८(अ), २९९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
केजरीवाल काय म्हणाले?
पीटीआयच्या वृत्तानुसार, अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की भाजप ‘घाणेरडे राजकारण’ करून दिल्लीतील लोकांना तहानलेले ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले होते- “हरियाणात भाजपचे लोक पाण्यात विष मिसळून दिल्लीला पाठवत आहेत. जर दिल्लीतील लोकांनी हे पाणी प्यायले तर अनेक लोक मरतील. यापेक्षा घृणास्पद काही असू शकते का?”
केजरीवाल यांच्या या आरोपावर हरियाणा सरकारने गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले होते. त्याच वेळी, निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांना हरियाणाने यमुना नदीचे पाणी विषारी बनवल्याच्या त्यांच्या दाव्यांच्या समर्थनार्थ पुरावे सादर करण्यास सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App