विशेष प्रतिनिधी
पाटणा: हेअर ट्रान्सप्लांट करणे किती धोक्याचे ठरू शकते हे पाटणमधील एका तरुणासोबत घडलेल्या घटनेने दिसून आले आहे. पोलीस असलेल्या एका तरुणाने लग्नाच्या अगोदर बारा दिवस हेअर ट्रान्सप्लांट केले. मात्र, त्यानंतर २४ तासांतच त्याचा मृत्यू झाला.Care should be taken while transplanting hair, young man died within 24 hours of the hair transplant
बिहार स्पेशल आर्म्ड पोलीसमध्ये तैनात असलेले २८ वर्षांचे मनोरंजन पासवान यांच्या डोक्याच्या पुढील भागावरील केस गळत होते. त्यामुळे टक्कल पडले होते. ११ मे रोजी त्यांचं लग्न होणार होतं. त्याआधी त्यांनी आपल्या डोक्यावर केस यावेत यासाठी हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला.
9 मार्चला त्यांच्यावर हेअर ट्रान्सप्लांट करण्यात आले. हेअर ट्रान्सप्लांटनंतर पोलीस आपल्या क्वार्टरवर गेला. रात्री अचानक त्याच्या ़डोक्यात तीव्र वेदना सुरू झाल्या. छातीत जळजळ जाणवू लागली. त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या इतर पोलीस जवानांनी त्याला हेअर ट्रान्सप्लांट केलेल्या त्या सेंटरमध्ये नेले.रुग्णालयात नेण्यात आल्यावर उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.
हेअर ट्रान्सप्लांटसाठी ५१ हजार रुपये सांगण्यात आले. डाऊनपेमेंट म्हणून मनोरंजन यांनी अकरा हजार रुपयांचं ऑनलाइन पेमेंटही केलं होतं. दर महिन्याला 4000 रुपये ईएमआय द्यायचा होता. मनोरंजन यांच्या मृत्यूनंतर सेंटरचा आणि सेंटरमधील काम करणा?्यांचा फोन बंद आहे, असंही गौतम यांनी सांगितलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App