प्रतिनिधी
चंडीगड : पंजाब मध्ये विधानसभा निवडणुकीच्या सुपर संडे प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी हे बडे नेते सहभागी झाले आहेत.या पार्श्वभूमीवर पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत ट्विटरवर वेगवेगळे हॅशटॅग जोरदार ट्रेंड झाले आहेत.CaptainModi4Punjab: Strong trend in Punjab in Super Sunday campaign
यात #CaptainModi4Punjab हा हॅशटॅग सध्या टॉपवर आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली. भाजपशी आघाडी केली. त्यानंतर हा ट्रेंड पंजाबमध्ये अनेकदा ट्विटरवर दिसतो.
प्रियांका गांधी यांच्या पंजाब दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन हॅशटॅग ट्विटरवर जोरदार ट्रेंड झाले आहेत. #PriyankaCryptoChanniDeNaal,#PriyankaPunjabNaal एक हॅशटॅग प्रियांकांच्या बाजूने तर दुसरा हॅशटॅग प्रियांकांच्या विरोधात ट्रेंड होताना दिसतो आहे.
पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. परंतु त्यांचे सरकार भाजपच रिमोट कंट्रोल वरचा लावत होते, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हा#PriyankaCryptoChanniDeNaal ट्रेंड सोशल मीडियावर चालवण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App