वृत्तसंस्था
पणजी : महाराष्ट्रातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथील होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अनेक मंडळींनी पर्यटनाला गोव्याला जाण्याचे बेत आखले असतील. परंतु लक्षात घ्या गोव्यात 7 जून पर्यंत संचारबंदी लागू आहे. त्यामुळे गोव्याला जाण्याचा बेत तूर्त तरी पर्यटकांना रद्द करावा लागणार आहे. Cancel Goa tourism plan; Curfew extended until June 7
गोव्यात कोरोना संकट गंभीर आहे. त्यामुळे गोव्यातील राज्यस्तरीय संचारबंदी 7 जून पर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली.
गोव्यात राज्यव्यापी संचारबंदी सुरु आहे. आता ती वाढवून 7 जूनपर्यत सकाळी 7 वाजेपर्यंत लागू आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तसे आदेश जारी केले जातील,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
दुपारी एकपर्यंत व्यवहार सुरु
गोव्यामध्ये सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु असतात. उद्योग धंदे सुरू आहेत. साप्ताहिक बाजार आणि मासळी ते बाजार बंद आहेत .सिनेमागृहे, जलतरणतलाव, सलून,स्पा, सांस्कृतिक आणि धार्मिक बंद आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more