वृत्तसंस्था
ओटावा : कॅनडातील ( Canada ) सरे येथे स्वातंत्र्यदिन साजरा करणाऱ्या भारतीय आणि खलिस्तानी समर्थकांमध्ये पुन्हा एकदा वातावरण तणावपूर्ण झाले. सरेमध्ये भारतीय तिरंगा घेऊन आणि हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा देत स्वातंत्र्यदिन साजरा करत होते. दरम्यान, खलिस्तानी समर्थकही पोहोचले. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून कॅनडाच्या पोलिसांना मदतीला यावे लागले.
ही घटना कॅनडातील सरे येथे घडली. कॅनेडियन वेळेनुसार 15 ऑगस्ट रोजी सकाळी सरे येथील गुरू नानक गुरुद्वाराबाहेर भारतीय जमले होते. हे तेच ठिकाण आहे जिथे 18 जून 2023 रोजी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. येथे भारतीय गुरुद्वाराबाहेर तिरंगा रॅली घेऊन पोहोचले आणि त्यांनी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, खलिस्तानी कट्टरपंथीयांनी भारतीय नागरिकांशी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला भारतीय तिरंगा फडकवत होते, तर दुसऱ्या बाजूला खलिस्तान समर्थक खलिस्तानी झेंडे घेऊन पोहोचले होते.
पोलिसांना मदतीसाठी यावे लागले
खलिस्तान समर्थक आणि भारतीय एकमेकांसमोर आल्यानंतर हाणामारी सुरू झाली. खलिस्तानमधून भारताविरोधात घोषणाबाजी सुरू झाली, तर भारतीयांनी खलिस्तानविरोधात घोषणाबाजी केली. शेवटी परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून कॅनडाच्या पोलिसांना मदतीला यावे लागले. पोलिसांनी दोन्ही पक्षांना एकमेकांपासून वेगळे केले.
भारतीयांनी खलिस्तान समर्थकांविरोधात निदर्शने सुरू केली. वातावरण पाहून गुरू नानक गुरुद्वाराबाहेर भारतीय जमा होऊ लागले. शेवटी खलिस्तान समर्थकांना तेथून निघून जावे लागले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App