विशेष प्रतिनिधी
फ्नॉम पेन्ह (कंबोडिया) | : Donald Trump कंबोडियाच्या सरकारने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.Donald Trump
कंबोडियाचे उपपंतप्रधान सन चंथोल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “थायलंड आणि कंबोडिया यांच्यात सुरू असलेल्या सीमासंघर्षावर ट्रम्प यांच्या थेट हस्तक्षेपामुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावरून माघारी फिरले आणि शांतता प्रस्थापित झाली. ट्रम्प यांनी हे संकट शांततेने हाताळले आणि आमच्या देशात पुन्हा स्थिरता आली. त्यामुळे अशा नेत्यानं जागतिक शांततेसाठी मिळणारा सर्वोच्च सन्मान मिळवावा, अशी आमची भूमिका आहे,” असे चंथोल यांनी फ्नॉम पेन्ह येथे सांगितले.Donald Trump
ही शिफारस व्हाईट हाऊसच्या मागणीनंतर करण्यात आली आहे. अमेरिकेच्या प्रेस सचिव करोलिन लेव्हिट यांनी मागील आठवड्यात पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले होते की, ट्रम्प यांनी केवळ आशियाच नव्हे तर जागतिक स्तरावर सहा प्रमुख देशांतील संघर्ष संपवले आहेत. त्यांनी सांगितले की, “अध्यक्ष ट्रम्प यांनी थायलंड-कंबोडिया, इस्रायल-इराण, रवांडा-काँगो, भारत-पाकिस्तान, सर्बिया-कोसोव्हो आणि इजिप्त-इथिओपिया या देशांमध्ये संघर्ष थांबवले आहेत. त्यांच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात जवळपास दर महिन्याला एक शांतता करार झाला आहे. आता वेळ आली आहे की जगाने त्यांच्या या प्रयत्नांना मान्यता दिली पाहिजे.”
कंबोडिया हा ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करणारा दुसरा देश ठरला आहे. याआधी पाकिस्तान सरकारने अधिकृतपणे २०२६ सालासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे नामांकन करण्याची घोषणा केली होती. त्यांनी एक्स (माजी ट्विटर) या समाजमाध्यमावरून म्हटले होते – “भारत-पाकिस्तान सीमावादात निर्णायक हस्तक्षेप करून दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्याचे काम ट्रम्प यांनी केले. त्यांच्या नेतृत्वामुळे युद्ध टळले. त्यामुळे त्यांना २०२६ साठी नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करण्यात येणार आहे.”
अनेक आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण अनेकवेळा वादग्रस्त ठरले असले तरी, त्यांनी काही ठिकाणी हस्तक्षेप करून लष्करी संघर्ष टाळले, सीमावाद शमवले आणि थेट संवाद साधून मार्ग काढण्यावर भर दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App