विशेष प्रतिनिधी
काेलकाता : कोलकाता येथील डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समाेर येत आहे. रुग्णालयातील डाॅक्टरनीच हे सैतानालाही लाजवेल असे कृत्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पाेलीसांनी चाैकशी सुरू केली आहे. पीडितेचा लैंगिक छळ झाल्याचेही शवविच्छेदन अहवालात दिसून आले आहे. Calcutta rape and murder: The hospital doctors are suspected , sexual harassment and abnormal sex
एका सीबीआय अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितलं की, पीडितेच्या आई-वडिलांनी आम्हाला सांगितली की त्यांच्या मुलीवरील बलात्कार व हत्येमागे अनेक जण असू शकतात. त्यांनी त्यांच्या मुलीबरोबर रुग्णालयात काम करणारे काही डॉक्टर व इंटर्न्सवर (प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी) संशय व्यक्त केला आहे. त्यांनी आम्हाला काही नावं दिली आहेत. सीबीआयने शुक्रवारी (१६ ऑगस्ट) रुग्णालयातील काही डॉक्टरांची, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची चौकशी केली जे घटनेच्या दिवशी रुग्णालयात हजर होते. यासह सीबीआयने रुग्णालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना चौकशीसाठी नेलं आहे.
Sharad Pawar : बांगलादेशात जिहादी सत्ता, हिंदूंवर अत्याचार; पवार म्हणाले, महाराष्ट्रात नकोत त्याचे पडसाद!!
बलात्कार व खूनाच्या घटनेनंतर डॉ. घोष यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.दरम्यान, पांचजन्य या साप्ताहिकाने पीडितेवर निर्घृण अत्याचार झाल्याचे म्हटले आहे. पीडितेच्या शवविच्छेदन अहवालाच्या हवाल्याने ‘पांचजन्य’ने म्हटले आहे की अॅबनॉर्मल सेक्स तसेच पीडितेचा तिचा लैंगिक छळ करण्यात आला. त्यामुळे गुप्तांगावर खोल जखमा झाल्या. पीडितेने ओरडू नये म्हणून तिचं नाक आणि गळा दाबण्यात आला, गळा आवळला गेल्याने थायरॉईड कार्टिलेजला इजा झाली. पीडितेचं डोकं भिंतीवर ठेवून तिचा गळा दाबण्यात आला, त्यामुळे तिला ओरडता आलंच नाही.
तिच्या पोटावर, ओठांवर, बोटांवर आणि डाव्या पायावर अनेक जखमा झाल्या. पीडितेवर इतका भयंकर हल्ला करण्यात आला की तिच्या चश्म्याच्या काचा तिच्या दोन्ही डोळ्यांमध्ये घुसल्या. त्यामुळे तिच्या डोळ्यांमधून आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्त वाहात होतं. पीडितेच्या चेहऱ्यावर नखाने ओरखडल्याच्या खुणा आहेत, पीडितेने स्वतःला वाचवण्यासाठी खूप संघर्ष केल्याचंही अहवालात नमूद आहे.
पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App