विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील डहाणू जवळ वाढवण येथे ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट प्रमुख बंदराच्या विकासास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्याची गुंतवणूक तब्बल 76,200 कोटी रुपयांची असेल. त्यामुळे तब्बल 10 लाख युवकांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून देशाच्या बंदर विकास क्षेत्रात तो गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहे. वाढवण बंदर प्रकल्प पूर्ण झाल्यावर हे बंदर जगातील टॉप 10 बंदरांपैकी एक असेल. Cabinet approves ‘Development of an all-Weather Greenfield deepdraft Major Port at Vadhavan in Maharashtra’
वाढवण येथे महाबंदर उभे राहिल्यास महाराष्ट्राचा एक कणभरही व्यापार गुजरातकडे जाणार नाही, अशी टिप्पणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. जवाहरलाल नेहरू बंदराच्या (जेएनपीटी) क्षमतेएवढे असणाऱ्या या बंदराचा सुरुवातीचा खर्च 10000 कोटी रुपये होता. या संदर्भात राज्य सरकारच्या महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाबरोबर ‘जेएनपीटी’चा करारही झाला आहे.
#Cabinet approves ‘Development of an all-Weather Greenfield deepdraft Major Port at Vadhavan in Maharashtra' On completion Rs.76,200 crore Port will be one of the top 10 ports of the world#CabinetDecisions pic.twitter.com/8weixCTy2E — Sheyphali B. Sharan (@DG_PIB) June 19, 2024
#Cabinet approves ‘Development of an all-Weather Greenfield deepdraft Major Port at Vadhavan in Maharashtra' On completion Rs.76,200 crore Port will be one of the top 10 ports of the world#CabinetDecisions pic.twitter.com/8weixCTy2E
— Sheyphali B. Sharan (@DG_PIB) June 19, 2024
वाढवण हे बंदर एवढ्या मोठ्या क्षमतेचे आहे, की त्यामुळे महाराष्ट्रामधील व्यापार गुजरातच काय, अन्य कोणत्याही ठिकाणी वळणार नाही. याउलट संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवरील व्यापार डहाणूकडे येईल. हे बंदर महाराष्ट्राचे व्यापारी भविष्य आहे, असे ते म्हणाले होते. त्या वेळचे केंद्रीय जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचेही या बंदराच्या उभारणीत मोठे योगदान आहे.
सुमारे 150 वर्ष जुन्या मुंबई बंदराची जागा कमी पडत असल्याने 1989 मध्ये न्हावाशेवाजवळ जेएनपीटी उभारण्यात आले. मात्र, गेल्या काही वर्षांत जेएनपीटीचीही क्षमता अपुरी पडू लागली. परिणामी मुंद्रा, पिपावह, कांडला या गुजरातमधील बंदरांकडे महाराष्ट्रातील व्यापार मोठ्या प्रमाणात वळू लागले. यापैकी मुंद्रा हे बंदर प्रख्यात उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीचे आहे.
ग्रीन फील्ड बंदर
डहाणू महाबंदरासाठी एक इंचही जमीन अधिग्रहण करावी लागली नाही. हे ग्रीन फील्ड बंदर असल्याने या बंदरामुळे पर्यावरणाला धोका नाही. हे बंदर खोल समुद्रात असल्याने पर्यावरणाला कोणताही धोका नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App