वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फक्त गुजरात पुरता प्रभाव उरला आहे. सर्व पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे, असे म्हणणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दावा बिहार आणि उत्तर प्रदेशात खोटा ठरला आहे. कारण उत्तर प्रदेशातल्या रामपूरची जागा समाजवादी पक्षाच्या आजम खान यांच्याकडून भाजपने खेचून घेतली आहे, तर बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपशी युती तोडून राष्ट्रीय जनता दलाबरोबर आघाडी केल्यानंतर देखील कुडनी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. तिथे भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. पण काँग्रेसची राजवट असणाऱ्या छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये त्या पक्षासाठी अच्छी खबर आली आहे. Byelections brought cheers to both BJP and Congress equally
रामपूर विधानसभा मतदार संघावर समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांचा वर्षानुवर्षे कब्जा होता त्यांच्या पंजातून मतदारसंघ सोडविणे फार अवघड होते. पण भाजपच्या आकाश सक्सेना यांनी हा राजकीय चमत्कार करून दाखवला आहे. रामपूर मधली आजम खान यांची सद्दी त्यांनी संपवली आहे.
मैनपुरीमध्ये डिंपल यादव विजय
मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशमधील मैनपुरी लोकसभाची जागा रिक्त होती. तिथल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव यांनी तब्बल 288461 मतांनी विजय मिळवला आहे. डिंपल यादव यांना 618120 मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपच्या रघुराज सिंह शाक्य यांना 329659 इतकी मते मिळाली आहेत. डिंपल यादव यांनी या विजयासह नवीन विक्रम केला आहे. डिंपल यादव यांना 64 % पेक्षा जास्त मते मिळाली आहेत. तर भाजप उमेदवाराला 34 % मतांवर समाधान मानावे लागले आहे.
उत्तर प्रदेशात खतौली विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रीय लोक दलाचे उमेदवार मदन भैया यांनी भाजपच्या उमेदवार राजकुमारी यांनी 22000 मतांच्या फराकने पराभव केला आहे, तर रामपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या आकाश सक्सेना यांनी समाजवादी पार्टीच्या मोहम्मद आसिम राजा यांचा 34136 मतांनी पराभव केला आहे.
बिहारमध्ये भाजपचा विजय
बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपनं विजय मिळवला आहे. कुडनी विधानसभा पोटनिवडणुकीत अटीतटीच्या लढतीत भाजपच्या केदार गुप्ता यांनी संयुक्त जनता दलच्या मनोज सिंह यांचा 3649 मतांनी पराभव केला. नितीश कुमार यांनी भाजपपासून फारकत घेतल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण त्यांना पराभव पत्करावा लागला.
छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा विजय
छत्तीसगडमधील भानुप्रतापपूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सावित्री मांडवी यांनी भाजपच्या ब्रह्मनंद यांचा 21171 मतांनी पराभव केला.
ओडिसामध्ये बिजु जनता दल विजयी
ओडिसामधील पदमपूर विधानसभा मतदारसंघात बिजू जनता दलाचे उमेदवार वर्षा सिंह बरिहा यांनी भाजपच्या प्रदीप पुरोहित यांचा 42679 मतांनी पराभव केला आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेस विजयी
राजस्थानमध्ये सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने एकमेव विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. सरदारशहरमध्ये काँग्रेसच्या अनिल कुमार शर्मा यांनी भाजपच्या अशोक कुमार यांचा 26852 मतांनी पराभव केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App