विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला. केवळ पश्चिम बंगालनेच थोडीफार लाज वाचविली. त्यामध्ये महत्वाचे योगदान असलेल्या अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेतील नेतपद देण्यात आले होते. मात्र, पश्चिम बंगालमधील विधानसभेत पूर्ण धुव्वा उडालेल्या कॉँग्रेसने ममता बॅनर्जी यांच्याशी सलगी साधण्यासाठी चौधरी यांचा बळी देण्याची तयारी केली आहे.By sacrificing the Adhir Ranjan Chaudhary, the Congress will get along with Mamata , plannes to remove him from the post of Lok Sabha leader
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दोन आठवड्यांपूर्वीच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी पक्षात मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेच्या नेतेपदावरून हटवण्याची शक्यता आहे.
त्यांच्या जागी लोकसभेच्या नेतेपदी अन्य नेत्याची वर्णी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसशी हातमिळवणी करण्यासाठी काँग्रेसने चौधरी यांना बळीचा बकरा बनविण्याच्या हालचाली सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.
पश्चिम बंगाल निवडणुकीत काँग्रेसने डाव्यांसोबत आघाडी करून निवडणूक लढवली होती. त्यांच्यासोबत अब्बास सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय धर्मनिरपेक्ष मोचार्ही होता. या निवडणुकीत काँग्रेसने ममता बॅनर्जींवर एका शब्दानेही टीका केली नव्हती.
काँग्रेसचा टीकेचा सर्व रोख भाजपकडेच होता. राहूल गांधी यांनी पश्चिम बंगालमध्ये फारशा सभाही घेतल्या नाहीत. या निवडणुकीत तृणमूल कॉँग्रेस आणि कॉँग्रेसची पडद्याआड युती झाल्याचीही चर्चा होती. आता पश्चिम बंगालमध्ये कॉँग्रेसला काहीच अस्तित्व उरलेले नाही.
त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्याशी जुळवून घेण्यासाठी अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेच्या नेतेपदावरून हटवण्यात येणार आहे. चौधरी हे बरहामपूरचे खासदार आहेत. मात्र, त्यांनी सातत्याने तृणमूलवर टीका केली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि चौधरी यांचे पटत नाही. ममता बॅनर्जी यांच्यासोबत भविष्यात आघाडी करायची असेल तर चौधरी यांना दूर करणे आवश्यक आहे. त्यामुळेच काँग्रेसने या हालचाली सुरू केल्या असल्याचं सांगितलं जात आहे.
चौधरी यांच्या जागेवर लोकसभेच्या नेतेपदी कुणाला बसवायचे याबाबतचा अद्याप निर्णय झालेला नाही. तिरुवनंतपूरमचे खासदार शशी थरुर आणि आनंदपूर साहिबचे खासदार मनिष तिवारी यांच्याकडे ही सूत्रे दिली जाऊ शकतात.लोकसभेतील नेतेपद राहुल गांधी यांच्याकडे देण्याची शक्यता कमी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App