मध्य प्रदेशात अपघातानंतर बसला आग, 13 जण जिवंत जळाले; राष्ट्रपती- पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

वृत्तसंस्था

गुना : मध्य प्रदेशातील गुना येथे बुधवारी सायंकाळी उशिरा डंपरला धडकल्यानंतर एका प्रवासी बसला आग लागली. यामध्ये 13 जण जिवंत जळाले. त्याचवेळी डंपर चालकाचाही मृत्यू झाला आहे. सुमारे 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Bus catches fire after accident in Madhya Pradesh, 13 burnt alive; Condolences from the President-Prime Minister

बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. बस गुना येथून आरोनच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या डंपरला धडकली. धडक होताच बसने पलटी होऊन पेट घेतला. दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर बसमधील आगीवर मिळवण्यात यश आले. गुनाचे एसपी विजय कुमार खत्री यांनी सांगितले की, बसमध्ये सुमारे 30 प्रवासी होते.



राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी गुरुवारी दुपारी 12.30 वाजता गुना जिल्हा रुग्णालयात पोहोचून जखमींची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी आरटीओ रवी बरेलिया यांना निलंबित केले आहे. अग्निशमन दल उशिरा पोहोचल्याने सीएमओ (मुख्य पालिका अधिकारी) बीडी कट्रोलिया यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

बुधवारी रात्री 8.30 च्या सुमारास हा अपघात झाला. बस गुना येथून आरोनच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या डंपरला धडकली. धडक होताच बस पलटी होऊन पेट घेतला. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर बसमधील आगीवर नियंत्रण मिळवता आले.

परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बसची नोंदणी किंवा विमा काढलेला नव्हता. फिटनेस प्रमाणपत्राची मुदतही संपली होती. जखमी प्रवाशांच्या जबाबाच्या आधारे बसमालक भानू प्रताप सिकरवार, चालक आणि डंपर चालक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये बस आणि डंपर चालकांच्या नावाचा उल्लेख नाही. वाहनांचे फक्त नोंदणी क्रमांक नोंदवले गेले आहेत.

भानू प्रताप हे कंत्राटदार आणि भाजप नेते विश्वनाथ सिकरवार यांचे धाकटे भाऊ आहेत. विश्वनाथ हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत.

मृतदेह उचलतानाही अवयव खाली पडत असल्याने अपघाताची भीषणता समजू शकते. एकूण 13 मृतदेह सापडले. बसमधून बाहेर काढण्यात आलेल्या नऊ मृतदेहांपैकी सात मृतदेह एकमेकांना चिकटले होते. कुटुंबियांना ओळख पटणार नाही, अशा प्रकारे मृतदेह जळाले आहेत.

दरम्यान, स्टेअरिंग आणि ब्रेक जाम झाल्याने डंपर थेट बसला धडकला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि अडकलेल्यांना बाहेर काढले. SDERF टीमही घटनास्थळी पोहोचली. सध्या मृतांची ओळख पटलेली नाही.

मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी बस अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले. याशिवाय मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले- या हृदयद्रावक अपघातात अकाली मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त करतो. या भीषण परिस्थितीत राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही बस अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

Bus catches fire after accident in Madhya Pradesh, 13 burnt alive; Condolences from the President-Prime Minister

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात