उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांमध्ये तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाची दहशत पसरत आहेच, पण कायदा वाटेल तसा वाकविण्याची सवय लागलेलेही राजकारणीही धास्तावले आहे. समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने स्वत:हून आपले अतिक्रमण काढून टाकले.Bulldozer Baba’s terror started behaving like a thread even to the socialist leaders
विशेष प्रतिनिधी
लखनौ: उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांमध्ये तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाची दहशत पसरत आहेच, पण कायदा वाटेल तसा वाकविण्याची सवय लागलेलेही राजकारणीही धास्तावले आहे. समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने स्वत:हून आपले अतिक्रमण काढून टाकले.
योगी सरकारच्या काळात गुन्ह्यांमधील आरोपींच्या घरावर आणि इतर मालमत्तांवर बुलडोझर चढवल्याच्या घटना घडल्या आहेत. या कारवाईमुळे अनेकदा गुन्हेगार स्वत:हून सरेंडर करताना दिसत आहेत. याच बुलडोझरच्या भीतीमुळे समाजवादी पक्षाच्या नेत्याने स्वत:चे कोल्ड स्टोरेज पाडल्याची घटना घडली आहे.
राज्यात दुसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन होताच जैत्रा येथील एका भट्टीभोवती शेकडो बिघा जमीन भूमाफियांनी बळकावून बेकायदा बांधकाम केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली होती. या तक्रारीची गांभिर्याने दखल घेत जिल्हा प्रशासनाने लेखपाल यांच्या पथकासह दोन दिवसांपूर्वी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचून अतिक्रमण झालेल्या जमिनीचे मोजमाप करुन घेतले. त्यानंतर पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचून बुलडोझरच्या सहाय्याने अवैध बांधकाम पाडून उर्वरित जागा ताब्यातून मोकळी केली.जिल्ह्याच्या राजकारणात दबदबापोलीस प्रशासनाच्या या कारवाईला घाबरून सपा नेते रामनाथ सिंह यादव यांचा मुलगा विक्रांत यादव यांनी स्वत: जैथरा येथील कोल्ड स्टोरेज फोडले. रामनाथ सिंह यादव हे प्रोफेसर राम गोपाल सिंह यादव यांचे निकटवर्तीय आहेत.
जिल्ह्याच्या राजकारणात रामनाथसिंह यादव यांचा मोठा दबदबा आहे. रामनाथ सिंह यादव यांचे मोठे बंधू रामेश्वर सिंह यादव हे सपाचे माजी आमदार आहेत आणि त्यांची वहिनी सध्या जिल्हा पंचायत अध्यक्ष आहेत. रामनाथ यादव यांचे सैफई कुटुंबाशी जवळीक असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास आतापर्यंत अधिकारी टाळाटाळ करत होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App