योगी सरकार करणार लखनऊमधील प्राचीन मंदिरांचा जिर्णोध्दार

अयोध्येत भव्य राममंदिर होणार असल्याने उत्तर प्रदेशात धार्मिक पर्यटन वाढणार आहे. यामुळेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने लखनऊमधील प्राचीन मंदिरांचा जिर्णोध्दार करण्याचा संकल्प सोडला आहे.  Yogi government to renovate ancient temples in Lucknow


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : अयोध्येत भव्य राममंदिर होणार असल्याने उत्तर प्रदेशात धार्मिक पर्यटन वाढणार आहे. यामुळेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने लखनऊमधील प्राचीन मंदिरांचा जिर्णोध्दार करण्याचा संकल्प सोडला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सत्तेला चार वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने लखनऊच्या जनतेला ही भेट देण्यात आली आहे. लखनऊच्या प्राचीन मंदिरांच्या डागडुजीसाठी तसंच परिसर आकर्षक करण्याच्या योजनेला योगी सरकारनं हिरवा कंदिल दाखवला आहे. या योजनेला मुख्यमंत्री पर्यटन संवर्धन योजनेत सामील करण्यात आले आहे. पर्यटन विभागाकडूनही या योजनाला प्रशासकीय आणि आर्थिक स्वीकृती मिळाली आहे.सहा मंदिरांसहीत पर्यटन स्थळांच्या विकासासाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. २० मार्चपासून मंदिरांच्या विकासकामाला सुरूवात होणार आहे. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचे चार वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात येणार आहे.

यो योजनेद्वारे चौकचं प्राचीन काली मातेचं मंदिर, चौपटिया भागातील संदोहन देवी मंदिर, माल भागातील ३०० वर्षांपूवीर्चं अहिंडर शिव मंदिर, इटौजा भागातील लासा मंदिर, अलीगंजमधील कपूरथला भागातील हनुमान मंदिर, रकाबगंजचं नागेश्वर महादेव मंदिर अशा अनेक मंदिर परिसरांचा विकास करण्यात येणार आहे. कानपूर रोडस्थित तलावाचं रुपांतर छठ पूजा स्थळात करण्यासाठी ५० लाख रुपये तसंच पिपराघाट स्मशानभूमी परिसराच्या विकास आणि सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Yogi government to renovate ancient temples in Lucknow

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*