Buldozar : गुंड माफियांवरील बुलडोझर कारवाईला ब्रेक; राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते खूष!!

Buldozar

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सरकारच्या हेतूविषयी शंका व्यक्त करत सुप्रीम कोर्टाने गुंड माफियांवरच्या बुलडोझर कारवाईला तात्पुरता ब्रेक लावला पण त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते खूष झाले. Buldozar not allow of home accused

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी बुलडोझर कारवाया करून गुंड माफियांना चाप लावला होता. मुख्तार अन्सारी, अतिक अहमद, मेरठचा भंगार माफिया हाजी गल्ला यांच्यासह अनेक गुंड माफियांच्या मोठमोठ्या बेकायदा मालमत्तांवर बुलडोझर चालवून त्यांना वठणीवर आणले होते. त्यांनी बळकावलेल्या जमिनी गरिबांना परत दिल्या होत्या. अनेक बलात्कारी, बाजारांमधून लूटपाट करणारे स्थानिक गुंड बुलडोजर कारवाईने घाबरून गळ्यात पाट्या अडकवून पोलीस स्टेशनमध्ये शरण आले होते.

योगींचा हा बुलडोझर पॅटर्न मध्य प्रदेश आणि राजस्थान मधल्या आधीच्या काँग्रेस सरकारने देखील अंमलात आणला होता. पण या बुलडोजर कारवाई विरोधात कम्युनिस्ट आणि जिहादी एक झाले. कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्या वृंदा कारात आणि जमीयत उलेमा ए हिंद ही संघटना सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने बुलडोजर कारवाईवर काही सवाल उपस्थित करत त्या कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, तर त्याचे कुटुंब दोषी असू शकत नाही. त्यामुळे बुलडोझर कारवाईचे समर्थन होऊ शकत नाही, असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने सध्या नोंदविले. या प्रकरणाची पुढची सुनावणी 17 सप्टेंबरला होणार आहे.

मात्र, गुंड माफिया यांच्यावरच्या बुलडोजर कारवाईला ब्रेक लागल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते खूश झाले. त्यांना गुंड माफियांच्या विरोधातल्या बुलडोझर कारवाई मध्ये “अमानवी मूल्ये” दिसली. भाजपचे असंविधानिक बुलडोजर मानवतेला आणि न्यायाला कूचलत होते. ते गरिबांच्या घरावर फिरवले जात होते. परंतु देश संविधानाने चालेल. सरकारच्या हातातल्या चाबकाने चालणार नाही, असे राहुल गांधींनी आपल्या एक्स हॅण्डल वर लिहिले. काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी यांनी देखील बुलडोझर कारवाईवर टीकाच केली. त्या कारवाईला ब्रेक लागल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Buldozar not allow of home accused

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात