बुलडाणा : पत्नीला मतदान करतानाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवणे आले अंगलट ; गोपनीयता भंग केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल


गोपनीयता भंग केल्याप्रकरणी उमेदवार महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बुलडाणा जिल्ह्यात बोराखेडी पोलिसांनी ही कारवाई केली.Buldana: problem came to post a photo of his wife voting on WhatsApp status ; Husband charged with breach of privacy


विशेष प्रतिनिधी

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर नगर पंचायतीसाठी २१ डिसेंबरला मतदान पार पडले. मतदानाच्या वेळी एक धक्कादायक प्रकार घडला आहे.उमेदवार महिलेच्या पतीने मतदान करतानाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. गोपनीयता भंग केल्याप्रकरणी उमेदवार महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बुलडाणा जिल्ह्यात बोराखेडी पोलिसांनी ही कारवाई केली.काय आहे प्रकरण?

दोन दिवसांपूर्वी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीदरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात हा प्रकार घडला .मतदानाच्या दिवशी शिवसेनेच्या उमेदवार वृषाली पाटील यांचे पती प्रवीण शेळके पाटील यांनी पत्नीला मतदान करण्यासाठी पत्नीच्या नावासमोर असलेल्या चिन्हावर बोट ठेऊन मतदान केले.

त्यानंतर मतदान करतानाचा फोटो काढत आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला होता.दरम्यान गोपनीयतेचा भंग आणि मतदारांना प्रभावित केल्याचा ठपका ठेवत आरोपी प्रवीण शेळके याच्यावर बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Buldana : problem came to post a photo of his wife voting on WhatsApp status ; Husband charged with breach of privacy

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*