प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोणतीही कर वजावटी शिवाय असलेली नवी कर प्रणाली आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत केले. लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नव्या कर प्रणालीसह इतर सर्व मुद्यांवर भाष्य केले. Budget 2023: Efforts to introduce a new tax system with no tax deductions
एमएसएमई सुधारणेवर भर
मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीत समतोल साधण्याचा प्रयत्न करत असून यासोबतच कर नियम सुलभ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सोबतच एमएसएमई क्षेत्राला मोठी कर्जे देऊन आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
नव्या कर प्रणालीबाबत काय म्हटले?
निर्मला सीतारामन यांनी तब्बल आठ वर्षांनंतर करप्रणाली बदलली. त्यामुळे नोकरदार आणि मध्यम वर्गाला दिलासा मिळाला. परंतु कर प्रणालीतला हा बदल एक विशिष्ट टप्पा आहे. त्या पलिकडे जाऊन कोणत्याही वजावटी नसलेली करप्रणाली लागू करण्याचा प्रयत्न सरकारचा असल्याचे निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. टॅक्स स्लॅबमध्ये करण्यात आलेल्या बदलाचा फायदा मध्यमवर्गाला होणार असल्याकडे त्यांनी विशेषत्वाने लक्ष वेधले आहे.
डिजीटल अर्थव्यवस्था
सरकार वेगवेगळ्या क्षेत्रात डिजीटल अर्थव्यवस्था सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. सरकारने यावेळी प्रथमच दुहेरी आकड्यांमध्ये भांडवली खर्चाची तरतूद केली आहे. 10 लाख कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्याचे सरकारचे प्राधान्य आहे. रोजगार वाढवण्यावर सरकारचा भर आहे आणि त्याचवेळी त्याला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले.
महिला सक्षमीकरणावर भर
महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला असून देशाच्या प्रगतीत त्यांचा सहभाग अधिक वाढवला जात असल्याचे त्यांनी सांगितले. औद्योगिक विकासासाठी सरकारही जोरदार प्रयत्न करत असून औद्योगिक क्रांती 4.0 च्या माध्यमातून लोकांना प्रशिक्षित करून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App