‘’बसपा UCC च्या विरोधात नाही, पण…’’ मायावतींचे मोठे विधान!


‘’घटनेच्या कलम ४४ मध्ये यूसीसी बनवण्याच्या प्रयत्नाचे वर्णन केले आहे, परंतु…’’ असंही मायावतींनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : समान नागरी संहितेबाबत देशात वाद सुरू झाला आहे. आम आदमी पार्टी आणि सुभासपा पाठोपाठ बहुजन समाज पक्षाने (BSP) देखील समान नागरी संहितेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बसपा सुप्रीमो मायावती यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांचा पक्ष समान नागरी संहितेच्या विरोधात नाही, पण जबरदस्तीने लादणे योग्य नाही. BSP is not against UCC Mayawatis big statement

माध्यमांशी बोलताना उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती म्हणाल्या की, समान नागरी कायद्याच्या सर्व पैलूंचा विचार केला पाहिजे. आमचा UCC ला विरोध नाही, पण एकसमान कायदा लागू करण्याच्या भाजपच्या मॉडेलवर आम्ही असहमत आहोत. ते पुढे म्हणाले की, प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारत देशात सर्व धर्माचे लोक राहतात. त्यांची स्वतःची राहणी, खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली आणि विधी आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

त्या पुढे म्हणाल्या की, देशात समान नागरी कायदा लागू केल्यास देश मजबूत होईल आणि लोकांमध्ये परस्पर सौहार्द वाढेल. घटनेच्या कलम ४४ मध्ये यूसीसी बनवण्याच्या प्रयत्नाचे वर्णन केले आहे, परंतु ते लादण्याचे नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन भाजपाने देशात UCC लागू करण्यासाठी काहीतरी पाऊल उचलायला हवे होते. आमचा पक्ष यूसीसीच्या अंमलबजावणीच्या विरोधात नाही, पण भाजपा आणि त्यांचे सरकार देशात ज्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करत आहे त्याशी आम्ही सहमत नाही.

BSP is not against UCC Mayawatis big statement

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात