याला म्हणतात, बिन बडबडीचा तडाखा; BRICS सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचा न्यूयॉर्कमध्ये धमाका!!

BRICS foreign

नाशिक : याला म्हणतात, बिन बडबडीचा तडाखा; BRICS सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचा न्यूयॉर्कमध्ये धमाका!!, अशी आंतरराष्ट्रीय घडामोडी भारताने अमेरिकेत घडवून आणली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या टर्ममध्ये निवडून आल्यापासून भारत आणि BRICS देशांविरुद्ध रोज बडबड करत असताना भारत किंवा ब्रिक्स देशांनी त्यांच्या रोजच्या बडबडीला तशाच बडबडीतून प्रत्युत्तर दिले नाही, तर ते प्रत्युत्तर नेहमी कृतीतूनच दिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी BRICS समूह कायमचा विसर्जित करण्याचा सल्ला दिला. तो कुणीही जुमानला नाही. उलट तो समूह अधिक मजबूत केला.

मोदींनी नाही जुमानले

डोनाल्ड ट्रम्प यांच्या बडबडीला न जुमानता पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये SCO सदस्य देशांच्या बैठकीला गेले. तिथे त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर संयुक्त वाटाघाटी केल्या. ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या अचाट टेरिफ वर तोडगा काढायचा यशस्वी प्रयत्न केला. मोदींनी चीन मध्ये जाऊन आणि चीन मधून परत आल्यानंतर सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांना कुठल्याही शब्दांनी प्रत्युत्तर दिले नाही, तर ते कृतीतून प्रत्युत्तर दिले. त्यांनी कालच रशियाच्या उपपंतप्रधानांशी राजधानी दिल्लीत वाटाघाटी केल्या. रशियाबरोबर मोठा कृषी करार कसा होईल याची पायाभरणी केली. कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील या वाटाघाटींमध्ये सहभागी करून घेतले.

जयशंकर यांची चाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे सगळे चीन आणि भारत या दोन देशांच्या भूमींमध्ये केले. पण त्या पलीकडे जाऊन भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या भूमीवर जाऊन एक मोठी कृती केली. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात BRICS सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक घेतली. सध्या सर्व देशांचे प्रमुख नेते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेसाठी जमलेत. या संधीचा राजकीय फायदा ब्रिक्स सदस्यांनी घेतला. BRICS सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक न्युयॉर्क मध्ये घेतली. या बैठकीला भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याबरोबरच चीन, रशिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबरच ब्रिक्स समूहाच्या समूहाच्या परिघात येणाऱ्या देशांचे राष्ट्र मंत्री सुद्धा सहभागी झाले.

बहुध्रुवीय संकल्पनेवर भर

या बैठकीचे अध्यक्षस्थान एस. जयशंकर यांनी भूषविले. त्यांनी या बैठकीमध्ये बहुध्रुवीय जगाची संकल्पना (multipolar world) दृढ करण्यास सांगितले. कुठल्याही एका देशाचे वर्चस्व संपूर्ण जग कधीच मान्य करणार नाही. जग कुठल्याही एका देशाच्या कायद्यानुसार चालणार नाही, असे स्पष्ट केले. BRICS सदस्य देश सर्व प्रकारचे स्वातंत्र्य, तंत्रज्ञान सहकार्य, तंत्रज्ञान आदान प्रदान यावर विश्वास ठेवतात. ते एकमेकांवर वर्चस्व गाजविण्यावर विश्वास ठेवत नाही, असे प्रतिपादन जयशंकर यांनी केले. जयशंकर यांच्या या मुद्द्यांना बैठकीतल्या सर्व सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी उचलून धरले.

जयशंकर किंवा अन्य परराष्ट्र मंत्र्यांनी आपापल्या भाषणांमध्ये अमेरिकेचे नाव सुद्धा घेतले नाही. त्या उलट BRICS सदस्य देशांचे सामर्थ्य वाढवून एकमेकांशी सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली. या सर्वांनी प्रोटोकॉल मध्ये राहूनच भाषणे केली. यापैकी कोणीही अनावश्यक पत्रकार परिषद घेऊन अनावश्यक बडबड केली नाही. पण अमेरिकेला विशेषतः ट्रम्प प्रशासनाला त्यांच्याच देशात जाऊन बिन बडबडीचा तडाखा दिला.

BRICS foreign ministers’ meeting in New York explodes

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात