भाजपशी युती तोडून नितीश कुमार पुन्हा आले विरोधी “भावी” पंतप्रधानांच्या रांगेत!!


विनायक ढेरे

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आज खरी ठरली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपशी युती तोडून टाकली. काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नितीश कुमार यांच्यात 7 – 8 मिनिटांची चर्चा झाली होती. त्यामध्ये कोणतीही तडजोड झाली नसल्याने नितीश कुमार यांनी आज संयुक्त जनता दल पक्षाच्या आमदार, खासदारांच्या बैठकीत भाजपशी युती तोडल्याचे जाहीर केले आणि ते आज दुपारी 4.00 वाजता राज्यपालांना भेटून मुख्यमंत्री पदाचा अर्थातच भाजप – जदय युती सरकारचा राजीनामा सादर करणार आहेत. Breaking alliance with BJP, Nitish Kumar is back in the ranks of opposition “future” Prime Ministers

– भाजप मंत्र्यांचा राजीनाम्यास नकार

मात्र, भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांपासून बाकीच्या मंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. ही खूप महत्त्वाची घडामोड आहे. वास्तविक कायदेशीरदृष्ट्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व मंत्र्यांचा आपोआपच राजीनामा येतो. पण तोपर्यंत देखील भाजपचे नेते मंत्रीपद सोडायला तयार नाहीत, याचाच अर्थ भाजपचे नेते अजूनही बिहारमध्ये वेगळी आक्रमक खेळी करण्याच्या मूडमध्ये आहेत हेच दिसून येते. ही आक्रमक खेळी नेमकी कोणती असेल हे हळूहळू स्पष्ट होत जाणार आहे.


बिहारमध्ये तणाव वाढला : नितीशकुमार युती तोडण्याच्या तयारीत? सर्व आमदार आणि खासदारांची बोलावली बैठक


– पंतप्रधान पदाचे पाचवे नाव

पण त्या पलिकडे जाऊन नितीश कुमार यांच्या राजकीय खेळीकडे पाहिले तर नितीश कुमार आता भाजप विरोधी गोटात जाऊन बसून भावी पंतप्रधान पदाच्या रांगेतले नवे नाव म्हणून जोडले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आधीच 4 “भावी” पंतप्रधान आहेत. त्यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि “कायम भावी” पंतप्रधान शरद पवार या चौघांचा अधिक समावेश आहेच!! आता त्यामध्ये नितीश कुमार यांच्या नावाची पाचवी भर पडली आहे. तसेही 2014 मध्ये नितेश कुमार यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत त्यांच्या समर्थकांनी घेतलेच होते म्हणजे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जर भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही पण एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले तर तडजोडीचे नाव म्हणून मोदींचे नाव मागे टाकून स्वतःचे नाव पुढे भेटायचा नितीश कुमार यांचा मनसुबा असल्याच्या त्यावेळी बातमी आल्या होत्या. म्हणजे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नितीश कुमार यांचे नाव त्या अर्थाने 2014 पासूनच आहे 2022 मध्ये त्याला नवी राजकीय कल्हई चढली आहे एवढेच!!

– पवार, नितीश मोदींपेक्षा वयाने मोठे!!

वैशिष्ट्य म्हणजे नितीश कुमार आणि शरद पवार हे पंतप्रधान मोदींपेक्षा वयाने मोठे आहेत आणि आपल्या राजकीय कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. खुद्द नीतीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची ही आपली शेवटची टर्म आहे, असे आधीच जाहीर केले होते. त्यातच त्यांना राष्ट्रपतीपदाच्या महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे ऐकले नाही आणि त्यांनी आदिवासी महिला नेत्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार बनवून निवडून आणले. अर्थातच नीतीश कुमार यांना स्वतःच्या कारकिर्दीसाठी हा राजकीय फाऊल वाटला आहे आणि यातूनच चिडून त्यांनी भाजपशी युती तोडून टाकली आहे.

– कोचिंग माफिया अँगल

बिहार मधल्या कोचिंग माफिया या विषयाचा देखील याला अँगल असल्याची चर्चा आहे. पण व्यापक विचार करता नितीश कुमार आता बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर भाजप – जदयू युतीचे नेते म्हणून न राहता जरी राजद – जदयू युतीचे नेते म्हणून त्याच पदावर विराजमान झाले तरी त्यांचे पाचवे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले आहे हे मात्र निश्चित!!

Breaking alliance with BJP, Nitish Kumar is back in the ranks of opposition “future” Prime Ministers

महत्वाच्या बातम्या 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*