वृत्तसंस्था
भोपाळ : बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मंगळवारी उज्जैनला पोहोचले. रणबीर आणि आलिया संध्याकाळी उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचले, परंतु मंदिरात येण्यापूर्वीच बजरंग दलाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना कडाडून विरोध केला आहे.Brahmastra Promotion Ranbir Kapoor and Alia Bhatt Protest in Ujjain, Mahakal’s Darshan for Film’s Success
यावेळी पोलिस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रणवीर कपूरने चित्रपटातील गौमातेबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आणि बजरंग दलाचा कार्यकर्ता दिलीप याला पोलिसांनी बेदम मारहाण केली. या गदारोळात उज्जैनला पोहोचलेले रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना महाकालचा आशीर्वाद घेता आला नाही. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा निषेध अजूनही सुरूच आहे.
अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा सहभाग आहे. यासोबतच बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानही कॅमिओ करताना दिसणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि बॉलिवूडलाही या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. कारण बऱ्याच दिवसांपासून बॉलीवूड चित्रपट प्रेक्षकांना आवडत नाही.
रणबीर कपूरसाठीही हा चित्रपट खूप लकी मानला जात आहे, कारण रणबीर आणि आलियाच्या लग्नानंतर ते दोघे या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपटाचे बजेट 300 कोटींहून अधिक सांगितले जात आहे आणि हा भारतातील सर्वात मोठ्या बजेट चित्रपटांपैकी एक आहे. ब्रह्मास्त्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच एक लाखाहून अधिक तिकिटांचे आगाऊ बुकिंग केले गेले आहे, त्यामुळे तो चांगली कमाई करू शकेल असा विश्वास आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App