सीआयएसएफने सुरक्षा वाढवली; दोन्ही ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पाटणा आणि जयपूर विमानतळांवर बॉम्ब स्फोट घडवण्याची धमकी दिल्यानंतर दोन्ही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ई-मेलद्वारे पाठवलेल्या धमकीमध्ये दोन्ही विमानतळांवर बॉम्बस्फोट करण्यात येईल, असे लिहिले होते. धमकीच्या ई-मेलनंतर सीआयएसएफने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. दोन्ही ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे.Bomb blast threat at Patna Jaipur airport
काही दिवसांत एकामागून एक, देशभरातील विमानतळ, रुग्णालये आणि शाळांना बॉम्ब स्फोटाच्या धमक्या येत आहेत. सर्व लोकांना ठार मारले जाईल, असे धमकीच्या ई-मेलमध्ये लिहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास धमकीचा ईमेल आला आहे.
सोमवारी पंजाबमधील अनेक रेल्वे स्थानकांना बॉम्ब स्फोटाच्या धमक्या मिळाल्या होत्या. धमकीचे पत्र मिळाल्यानंतर पंजाबमधील रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या नावाने पत्र पाठवण्यात आले होते. पत्रात पंजाबच्या अनेक रेल्वे स्थानकांचा उल्लेख करण्यात आला होता, ज्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. पत्र मिळाल्यानंतर पंजाब पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून सर्व रेल्वे स्थानकांवर तपास सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App