Pakistan : पाकिस्तानात बॉम्बस्फोट, दोन मुलांचा मृत्यू, 7 पोलिसांसह 16 जण जखमी

Bomb blast in Pakistan

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या ( Pakistan  ) दक्षिण-पश्चिम भागात शनिवारी झालेल्या बॉम्बस्फोटात दोन मुले ठार आणि 16 जण जखमी झाले. जखमींमध्ये सात पोलिसांचाही समावेश आहे. हा हल्ला रिमोट कंट्रोल बॉम्बने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा बॉम्ब एका मोटारसायकलमध्ये बसवण्यात आला होता, ज्याचा दक्षिण पाकिस्तानातील पिशीन येथील पोलीस मुख्यालयाजवळ स्फोट झाला.

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान दहशतवादविरोधी विभाग (CTD) आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी तपासासाठी तैनात करण्यात आले आहे. कोणत्याही गटाने या घटनेची जबाबदारी स्वीकारली नसली तरी, या भागातील नागरिक आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करणाऱ्या फुटीरतावादी गटांकडून वाढत्या हिंसाचाराशी त्याचा संबंध असल्याचे संकेत मिळत आहेत.



पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी स्फोटात मारल्या गेलेल्या मुलांचे शहीद असे वर्णन केले आणि जबाबदार असलेल्यांची ओळख करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दुचाकीमध्ये स्फोटके

पोलीस अधिकारी मुजीब-उर-रहमान यांनी सांगितले की, या परिसरात उभ्या असलेल्या मोटारसायकलमध्ये स्फोटक बसवण्यात आले होते. पाकिस्तानी मीडियानुसार, प्रांतीय सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद म्हणाले की, “दहशतवादी त्यांचे नापाक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निष्पाप लोकांना लक्ष्य करत आहेत.”

Bomb blast in Pakistan, 2 children killed, 16 injured including 7 policemen

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात