स्फोटाचा आवाज दोन किलोमीटरपर्यंत पोहचला, नागरिकांमध्ये दहशत
विशेष प्रतिनिधी
डोंबिवली : येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज दोन ते तीन किलोमीटरपर्यंत ऐकू आला. आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या.Boiler explosion in Dombivli 6 dead over 30 injured
या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्फोटात काही वाहनांचे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली आगीच्या घटनेवर शोक व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, “डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलर स्फोटाची घटना दुःखद आहे. 8 जणांना निलंबित करण्यात आले आहे. जखमींवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.”
ते म्हणाले, “मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून तेही १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दलाच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App