विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने अनोखी रणनिती आखल्याची चर्चा सुरू आहे. समाजवादी पक्षाला धोबीपछाड देण्यासाठी कॉँग्रेसला आणि प्रियंका गांधी यांना बळ देणे भाजपने सुरू केले आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या मतांमध्ये मोठी फाटाफुट होण्याची शक्यता आहे.BJP’s strategy is to give strength to Priyanka Gandhi to launder the Samajwadi Party
उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष असला तरी यंदाची निवडणूक ही चौरंगी होणार आहे. त्यामध्येही भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्षामध्ये तीव्र चुरस होणार आहे. उत्तर प्रदेशातील कॉँग्रेसची पाळेमुळे उखडली गेली असली या पक्षाकडे विशिष्ट मते आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि कॉँग्रेस यांची आघाडी होती. मात्र, दोन्ही पक्ष ,एकमेंकांना आपली मते ट्रान्सफर करू शकले नाहीत. त्यामुळे यंदाच्या वेळी दोघांनीही वेगवेगळे लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, कॉँग्रेसला अद्यापही आपला बेस तयार करता आलेला नाही. लखीमपूर खेरी येथील घटनेवरून आक्रमक झालेल्या प्रियंका गांधी यांना बळ देऊन समाजवादी पक्षाची मते विभागण्याची रणनिती भाजपाने आखली आहे.
लखीमपूर खेरीमधील हत्याकांडामुळे झालेल्या राजकीय घडामोडींनंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांना हळुहळू विधानसभा निवडणुकीतील पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून मतदारांसमोर आणण्याचा प्रयत्न कॉँग्रेसकडून केला जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी प्रियंका यांच्या कृतींवर आक्रमक टीका करून त्यांना जाणीवपूर्वक राजकीय बळ दिले आहे.
लखीमपूरमधील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर शुक्रवारी प्रियंका गांधी-वाड्रा लखनऊमध्ये इंदिरा नगरमधील दलित वस्तीतील वाल्मिकी मंदिरात गेल्या. त्यांनी त्या परिसरात हाती झाडू घेत साफसफाई केली. त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, प्रियंका या झाडू चालविण्याच्या योग्यतेच्या असल्याची टीका केली.
योगींच्या टीकेमुळे प्रियंका यांची स्वच्छता मोहीम हा राजकीय मुद्दा बनला असून काँग्रेसनेही योगींना प्रत्युत्तर दिले. झाडू हातात घेणे हे कनिष्ट दजार्चे काम नाही. योगींनी जातीयवादी टीका केली असून महिला व दलित समाजाचा अपमान केल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
रविवारी, लखीमपूरला जाताना सीतापूर येथे पोलिसांनी प्रियंका यांना अटक केली होती. त्यानंतर रात्री प्रियंका यांनी झाडलोट करून खोली स्वच्छ केली होती. रविवार तसेच, शुक्रवार या दोन्ही दिवसांतील प्रियंकांच्या स्वच्छता मोहिमेची छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफीत काँग्रेसने प्रसारित केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App