प्रतिनिधी
नवी दिल्ली : सन २०२४ मध्ये होणाऱ्या देशातील लोकसभा निवडणुकांसाठी जवळपास १८ महिन्यांचा कालावधी आहे.मात्र भाजप ने आता पासुनच राज्यात तयारी सुरु केली आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाची पूर्ण वेळ प्रभारी पदाची जबाबदारी देशाच्या तिजोरीच्या चाव्या असणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सीतारामन अशी लढत होण्याची शक्यता आहे.BJP’s Mission Baramati Finance Minister Sitharaman likely to fight against Supriya Sule, move to shock Pawar
याबाबत बारामती दौऱ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देशपातळीवर भाजप विरोधी मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दुसरीकडे भाजपने ज्येष्ठ नेते पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे नेतृत्त्व करीत असलेल्या बारामती लोकसभा मतदासंघात खुद्द सीतारामन यांना उतरविले आहे. याबाबत बावनकुळे यांनी या मतदारसंघातील रणनीती उलगडली.
मतदारसंघासाठी गरज असणाऱ्या कामांचा सीतारमण आढावा घेतील. तसेच केंद्र सरकारच्या सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या योजनांची गेल्या अडीच वर्षात झालेली अंमलबजावणीचादेखील आढावा सीतारामन घेणार आहेत.
निर्मला सीतारामन १८ महिन्यात करणार ६ मुक्कामी दौरे सीतारामन या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या पूर्णवेळ प्रभारी असून सीतारामन या पुढील १८ महिन्यात बारामती लोकसभा मतदासंघात पाच ते सहा वेळा येतील. प्रत्येक वेळी मतदारसंघात त्या तीन दिवस मुक्काम करणार आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App