तेलंगणात सामाजिक – राजकीय भूकंप; भाजप देणार BC मुख्यमंत्री!!; 4 % धार्मिक आरक्षण रद्द करण्याचेही आश्वासन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तेलंगणाच्या राजकारणामध्ये सामाजिक – राजकीय भूकंप आणणारा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळून पक्ष सत्तेवर आला तर भाजप राज्याला पहिला मागासवर्गीय BC मुख्यमंत्री देईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिले आहे. BJP will make BC chief minister if elected to power in telangana

अखंड आंध्र प्रदेश आणि विभाजित आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये रेड्डी समुदायाचे वर्चस्व आहे. आत्तापर्यंत या राज्यांमध्ये सर्वाधिक मुख्यमंत्री रेड्डीच राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर BC अर्थात मागासवर्गीय मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्णय सामाजिक मार्गाने राजकीय भूकंप आणणारा ठरणार आहे.

तेलंगणामध्ये भाजपने कोणत्याही पक्षाशी युती किंवा आघाडी केलेली नाही. राज्यात भारत राष्ट्र समिती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप अशी तिरंगी लढत होत आहे. भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेस यांच्या तुलनेत भाजपची राजकीय ताकद तेलंगणात नगण्य आहे, पण हैदराबाद – सिकंदराबाद यांच्यासारख्या महापालिका क्षेत्रांमध्ये भाजपची ताकद कॉन्सन्ट्रेट झाली आहे. आदिलाबाद, खम्मम सारख्या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात भाजप ताकद लावून आहे. पण तेलंगणाला पहिला मागासवर्गीय BC मुख्यमंत्री देण्याची घोषणा केल्यामुळे राज्यातली राजकीय आणि सामाजिक समीकरणे बदलण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

त्याचबरोबर तेलंगणात भाजप सत्तेवर आल्यास धार्मिक आधारावरचे 4 % आरक्षण रद्द करून त्या ऐवजी SC-BC आरक्षण वाढवून त्यामध्ये जास्तीत जास्त वर्गांचा समावेश करण्याचे तसेच EBC आरक्षणाची अंमलबजावणी करून त्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन आणि अन्य सामाजिक वर्ग तसेच महिलांचा समावेश करण्याचे आश्वासन भाजपने देऊन तेलंगणाचे राजकारण वेगळ्या वळणावर नेण्याचा इरादा जाहीर केला आहे.

तेलंगणात भाजपने उघडपणे स्वतंत्रपणे सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिल्याने तेलंगणाच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे भारत राष्ट्र समिती आणि असदुद्दीन ओवैसी यांची एआयएमआयएम यांची युती, काँग्रेसचा जातनिहाय जनगणनेचा आग्रह या पार्श्वभूमीवर भाजपने थेट मागासवर्गीय मुख्यमंत्री देण्याची घोषणा करून तेलंगणाच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप आणला आहे.

BJP will make BC chief minister if elected to power in telangana

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात