शरद पवार गटातील आठ आमदारांना विधीमंडळाने बजावली नोटीस आठ दिवसांत म्हणणं मांडण्याची दिली मूदत


वृत्तसंस्था

मुंबई : पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये, अशी याचिका अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाच्या आठ आमदारांना विधीमंडळानं नोटीस बजवली आहे. आपलं म्हणणं मांडण्याची विधीमंडळाच्या नोटीसीद्वारे या आठ आमदारांना. आठ दिवसांत मुदत देण्यात आली आहेत.Legislature issued notice to eight MLAs of Sharad Pawar group



या आठ आमदारांमध्ये १)रोहित पवार , २) राजेश टोपे, ३) सुनिल भुसारा, ४) प्राजक्त तनपुरे, ५) अनिल देशमुख , ६) संदीप ७) बालासाहेब पाटील, ८) क्षिरसागर सुमन पाटील यांचा समावेश होतो.
आत्तापर्यंत शरद पवार गटातील दहा आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. कारण, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वीच नोटीस पाठवण्यात आलेली आहे. याशिवाय, शरद पवार गटातील अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांना मात्र नोटीस नाही. तर नवाब मलिक यांच्याकडून तटस्थ राहणं पसंद केल्याने त्यांना देखील नोटीस नाही. शरद पवार गटाकडून लवकरच यावर उत्तर दाखल करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात काही आमदार बाहेर पडल्याने फूट पडली. यानंतर शरद पवार गटाकडून बाहेर पडलेल्या आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली. परंतु, अजित पवार गटाने विधीमंडळात याचिका दाखल करत, आपल्या का अपात्र केले जाऊ नये हे सांगितले. त्यावर उत्तर देण्यासाठी विधीमंडळाने सुरुवातीस जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या दोघांना नोटीस बजावली होती.

Legislature issued notice to eight MLAs of Sharad Pawar group

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात