विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अरविंद केजरीवालांचा कालपर्यंतचा थाट राणा भीमदेवी पण पराभव होताच आम आदमी पार्टीच्या ऑफिसला आतून कडी!! असे चित्र आज राजधानीत दिसले. bjp vs aap delhi election results 2025 news heavy defeat in delhi
अरविंद केजरीवालांची दिल्लीची दोन टर्मची सत्ता गेली. नवी दिल्ली मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. मनीष सिसोदिया, दुर्गेश पाठक, सत्येंद्र जैन हे त्यांचे शिलेदार देखील हरले. एकट्या अतिशी मार्लेना कशाबशा जिंकून आल्या.
दिल्लीत केजरीवाल्यांचा पराभव आणि भाजपचा विजय होताच भाजपच्या कार्यालयामध्ये तुफान जल्लोष झाला. काँग्रेसच्या हाती शून्य भोपळा आला, तरी गांधी परिवाराचे जावई खुश झाले रॉबर्ट वाडरा यांनी अरविंद केजरीवालांना बरीच खरी खोटी सुनावली.
पण या सगळ्या निकालावर आम आदमी पार्टी अळीमिळी गुपचिळी करून चूप राहिली. आम आदमी पार्टीच्या एकाही नेत्यांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, उलट त्यांनी दिल्लीतल्या मुख्यालयाला आतून कडी लावून घेतली.
दिल्लीच्या निकालांच्या दिवशी फार्म १७ सी नुसार प्रत्येक बुथवरचे मतदान निवडणूक आयोगाने वेबसाईटवर टाकावे अशी मागणी कालच केजरीवाल यांनी केली होती परंतु निवडणूक आयोगाने ते केले नाही तर आम आदमी पार्टी आपल्या वेबसाईटवर बूथनिहाय मतदानाची आकडेवारी टाकेल असे त्यांनी जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याबरोबर आम आदमी पार्टीने आपल्या मुख्य कार्यालयालाच आतून कडी लावून घेतली. मतांच्या फुटीमुळे पराभव झाला की दारू घोटाळ्यामुळे पराभव झाला केजरीवाल जैन सिसोदिया यांच्या तुरुंगवासामुळे सरकारची प्रतिमा खराब झाली की अन्य कुठल्या कारणांसाठी पराभवाचे तोंड पहावे लागले या सगळ्या सवालांची उत्तरे आम आदमी पार्टी कडून अपेक्षित असताना त्यांचे नेते पक्षाच्या मुख्यालयाला आतून कडी लावून बसून राहिले.
विधानसभा निवडणुकीत तुफान प्रचार करत संपूर्ण दिल्लीभर हिंडलेले तुफानी वक्ते पराभव होता त्यावर साधी प्रतिक्रिया व्यक्त करायला देखील बाहेर आले नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App