पत्रकार निधी रझदान, रोहिणी सिंग यांच्यापेक्षा भाजपा प्रवक्तया निघत अब्बास हुशार, हॉवर्ड विद्यापीठाचा बनावटगिरी ओळखून केली तक्रार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हॉवर्ड विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर पदासाठी नियुक्ती झाल्याचे सांगून फसविल्याचे पत्रकार निधी रझदान यांच्या लक्षातच आले नाही. पत्रकार रोहिणी सिंग यांचीही अशीच फसवणूक झाली होती. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या निघत अब्बास यांनी मात्र ही फसवणूक ओळखून त्याची रितसर तक्रार केली.BJP spokesperson Nighat Abbas is smarter than journalist Nidhi Razdan and Rohini Singh, complaining about Howard University

निधी रझदानसह भारतातील अनेक प्रमुख महिला पत्रकार आणि माध्यकर्मींना ऑनलाइन स्कॅमर्सनी हार्वर्डमध्ये प्रतिष्ठित नोकºया देण्याचे आश्वासन देऊन लक्ष्य केले होते. २०१९ साली महिला पत्रकार रोहिणी सिंग यांना अशा प्रकारच्या फसवणुकीच्या प्रकाराला प्रकाराला सामोरे जावे लागले होते.



पत्रकार झाईनाब सिकंदर यांच्या बाबतीतही हा प्रकार घडला होता. या दोघींनाही ट्विटरवर हार्वर्ड इथं होणाऱ्या एका माध्यम परिषदेचं बनावट आमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र अनेक प्रसिद्ध महिला पत्रकारांना अशा पद्धतीची बनावट आमंत्रणं येत होती. यातून त्यांची फसवणूक होत होती.

भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्तया निघत अब्बास यांचीही अशीच फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला. घोटाळेबाजांनी त्यांचा पासपोर्ट तपशील आणि इतर वैयक्तिक माहिती मागितली तेव्हा त्यांनी ईमेलमध्ये समाविष्ट असलेल्या हार्वर्ड प्रशासकांपैकी एक असलेल्या बेली पेने यांच्याकडे थेट चौकशी केली. त्या प्रशासकाने दिलेल्या प्रतिसादात असे म्हटले की त्यांना पाठवलेले आमंत्रण बनावट होते.

अब्बास यांनी पेने यांनी सांगितल्यानुसार आपल्याला सौदी अरेबियातून आलेल्या फोनचे नंबर, बनावट हार्वर्ड दस्तऐवजांचे ईमेल, स्क्रीनशॉट आणि हॉटेल बुकिंग रेकॉर्ड हे सर्व पाठवले. त्यामुळे त्यांची फसवणूक होऊ शकली नाही.

दुसºया बाजुला याबाबत रितसर तक्रार होऊनही हॉवर्ड विद्यापीठाने आत्तापर्यंत काहीही कारवाई केली नाही. हार्वर्डचे प्रवक्ते जेसन न्यूटन यांनी अब्बास यांनी दिलेल्या माहितीचे विद्यापीठाने काय केले यावर भाष्य करण्यास नकार दिला असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

BJP spokesperson Nighat Abbas is smarter than journalist Nidhi Razdan and Rohini Singh, complaining about Howard University

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात