‘सपने नहीं हकीकत बुनते हैं, तभी तो सब मोदी को चुनते हैं’ ‘ भाजपने 12 भाषांमध्ये रिलीज केलं नवं प्रचारगीत!

3 मिनिटे 19 सेकंदांच्या या नवीन गाण्याची देशभरात चर्चा आहे. BJP released a new campaign song in 12 languages

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसंदर्भात देशातील मतदारांपर्यंत विविध राजकीय पक्ष विविध उपाययोजना करत आहेत. दरम्यान, देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष भाजपने 12 भाषांमध्ये ‘म्हणूनच प्रत्येकजण मोदींना निवडतो’ या थीमवर नवीन गाणे रिलीज केले आहे. या गाण्याच्या माध्यमातून मोदी सरकारने दिलेली कामे आणि आश्वासने पूर्ण केल्याचा दावा भाजप करत आहे. ‘सपने नहीं हकीकत बुनते हैं, तभी तो सब मोदी को चुनते हैं’ या गाण्यावर भाजप जोरदार प्रचार करत आहे.

निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून भाजपने बुधवारी एक नवीन गाणे रिलीज केले आहे. हे नवीन गाणे संपूर्ण देशाच्या भावना दर्शवते असा दावाही करण्यात आला आहे. या नवीन गाण्यात 2014 पूर्वीची परिस्थिती आणि 2014 मध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर भारताचे बदललेले चित्र दाखवण्यात आले आहे.


लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केला जाहीरनामा


भाजपने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या 3 मिनिटे 19 सेकंदांच्या या नवीन गाण्यात देशाच्या कानाकोपऱ्यातील, प्रत्येक भाषा बोलणारे, विविध पार्श्वभूमीचे लोक एका आवाजात एक गोष्ट सांगत आहेत की त्यांच्या सामूहिक स्वप्नांना उड्डाण मिळाले आहे. यात ‘सपने नहीं हकीकत बुनते हैं, तभी तो सब मोदी को चुनते हैं’ हा दावाही ठळकपणे दिसून आला आहे.

BJP released a new campaign song in 12 languages

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात