जाणून घ्या आता कधी होणार बैठक आणि शपथविधी सोहळ्याचा नवा मुहूर्त कोणता असणार?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Delhi दिल्लीत आज (सोमवार) होणारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभही १८ फेब्रुवारीऐवजी २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. असल्याची माहिती समोर आली आहे.Delhi
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे आणि आम आदमी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्लीत भाजपने ७० पैकी ४८ विधानसभा जागा जिंकल्या आहेत तर आम आदमी पार्टीला फक्त २२ जागा मिळाल्या आहेत. एवढंच नाहीतर अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया सारखे मोठे नेते निवडणुकीत पराभूत झाले आहेत.
त्यामुळे आता दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री असणार हे स्पष्ट झाले आहे. तर २७ वर्षांनंतर, दिल्लीत भाजप पुन्हा सत्तेत आलेला भाजपचा मुख्यमंत्री कोण असणार याची सर्वांना उत्सुकता आहे. परंतु अद्याप मुख्यमंत्रिपदासाठी कोणतेही नाव निश्चित झालेले नाही. अशा परिस्थितीत, आज (१७ फेब्रुवारी) होणाऱ्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भाजप कोणाला मुख्यमंत्री म्हणून घोषित करते या निर्णयावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते, मात्र ही बैठक पुढे ढकलली गेल्याची माहिती समोर आली आहे.
तथापि, दिल्लीतील काही नेत्यांची नावे अजूनही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत, ज्यामध्ये नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांचा पराभव करणारे परवेश वर्मा यांचे नाव समाविष्ट आहे. मात्र, भाजप मुख्यमंत्रिपदाची सूत्रे कोणाकडे सोपवणार लवकरच स्पष्ट होईल.
खरं तर, या आधी काही राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या निवडीबाबत धक्कातंत्र वापरलेले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात जेव्हा मुख्यमंत्र्यांची घोषणा होणार होती, तेव्हा भाजपने अशा चेहऱ्यांना मुख्यमंत्री बनवले ज्यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कुठेही नव्हती. अशा परिस्थितीत, भाजपने दिल्लीतही हीच नीती अवलंबली तर आश्चर्य वाटायला नको.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App