विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने देशाच्या सीमावर्ती राज्यांच्या सीमावर्ती जिल्ह्यांच्या विकासावर भर देऊन त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरघोस तरतूद देखील केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विविध भाषणांमध्ये आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांमध्ये त्या विषयावर भर देखील दिला गेला. देशाच्या सीमावर्ती राज्यांमधल्या सीमावर्ती जिल्ह्यांचा विकास इतर राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या तुलनेत मागे पडल्याने तेथे विकासापासून ते सुरक्षेपर्यंत गुंतागुंतीचे प्रश्न तयार झाल्याची केंद्र सरकारची भूमिका आहे आणि ते प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने केंद्रातील मोदी सरकारने ठोस पावले देखील उचलली आहेत.BJP organisation should be strengthened at the border areas, appeals Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोपाच्या भाषणात देखील याच बाबींचे प्रतिबिंब पडलेले दिसले. देशाच्या सीमावर्ती राज्यांमधील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये भाजपने संघटनात्मक पातळीवर भर द्यावा. सरकारच्या योजना तिथल्या सर्व समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात. तेथे सेवा ही संघटन या भूमिकेतून भाजपचे संघटनात्मक काम वाढवावे. याकडे फक्त व्होट बँकेचे राजकारण म्हणून न पाहता देशाच्या विकास कामात सीमावर्ती जिल्ह्यांना देखील सहभागी करून घेण्याची भूमिका विशेषत्वाने घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.
पंतप्रधान मोदींच्या भाषणाची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या मुद्द्यांवर समारोपाच्या भाषणात भर दिला याची माहिती देताना फडणवीस यांनी सीमावर्ती राज्यांमधील सीमावर्ती जिल्ह्यांचा प्रमुख उल्लेख केला. त्याचबरोबर देशाच्या अमृतकालात जेव्हा देश प्रगतीचा मोठा टप्पा गाठतो आहे, तेव्हा संघटनात्मक पातळीवर भाजप कोणत्याही प्रकारे कमी पडता कामा नये. राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देऊन समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
त्याचबरोबर भाजपचे सदस्यता अभियान सध्या सुरू आहे. या अभियानाबरोबरच प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजप सदस्यांची संमेलने व्हावीत. भाजपच्या वेगवेगळ्या मोर्चांची संमेलने घेऊन त्यामध्ये या सदस्यांना सहभागी करून घ्यावे, याचा रोड मॅप तयार केल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App