वृत्तसंस्था
कोलकाता – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकीत ममता बॅनर्जींनी अभूतपूर्व विजय मिळविल्यानंतर बंगालमधल्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यापैकी मोठी खळबळ भाजपमध्ये आहे. BJP National Vice President Mukul Roy is likely to join TMC.
बंगालमध्ये एक मोठे नेते आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय हे भाजप सोडून पुन्हा एकदा घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. ते तृणमूळ काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आपल्या निकटवर्तीयांशी चर्चा करून मुकूल रॉय हे तृणमूळ काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेऊ शकतात, असे सांगण्यात येते आहे.
मुकूल रॉय हे भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. त्यांच्या पत्नी कोरोनाने आजारी होत्या त्यावेळी दररोज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या त्यांची चौकशी करण्यासाठी फोन करीत होत्या, हा आमच्यासाठी खूप दिलासा होता, असे विधान मुकूल रॉय यांच्या चिरंजीवांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. त्याचवेळी मुकूल रॉय हे तृणमूळ काँग्रेसमध्ये परतणार असल्याच्या बातम्या तेजीत आल्या होत्या.
BJP National Vice President Mukul Roy is likely to join TMC. The decision regarding his joining will be taken after his meeting with the party's top brass in Kolkata today: Sources (file photo) pic.twitter.com/Q26UmmXX1h — ANI (@ANI) June 11, 2021
BJP National Vice President Mukul Roy is likely to join TMC. The decision regarding his joining will be taken after his meeting with the party's top brass in Kolkata today: Sources
(file photo) pic.twitter.com/Q26UmmXX1h
— ANI (@ANI) June 11, 2021
मुकूल रॉय हे एकेकाळी ममता बॅनर्जींच्या निकटवर्ती नेत्यांमधले एक नेते मानले जात होते. २०१८ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपचे काम केले होते. भाजपला बंगालमध्ये १८ लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळविता आला होता.
मात्र, विधानसभा निवडणूकीच्या वेळी भाजपने सुवेंदू अधिकारींना महत्त्व दिले आणि मुकूल रॉय हळूहळू मागे पडले. आता तर सुवेंदू अधिकारींना भाजपने विधानसभेतले विरोधी पक्षनेते पद देखील दिले आहे. त्यामुळे भाजपमध्ये अधिकारींचे राजकीय महत्त्व आपल्यापेक्षा वाढल्याची मोठी खंत मुकूल रॉय यांना असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App