वृत्तसंस्था
देहराडून : पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना “भाऊ” म्हणून संबोधल्याबद्दल भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बलुनी यांनी गुरुवारी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनाफटकारले आहे. या मुद्यावरून कॉंग्रेस नेत्याकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बलुनी यांच्याकडून आम्हाला राष्ट्रवादाचे व्याख्यान ऐकण्याची गरज नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. BJP MP slams Harish Rawat for calling Pak army chief ‘brother
हरीश रावत यांनी अलीकडेच एक ट्विट केले. त्यात म्हंटले होते की, काँग्रेसच्या पंजाब युनिटचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांनी इस्लामाबादमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधीच्या वेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना मिठी मारली होती. या मिठीचे समर्थन रावत यांनी केले. एक पंजाबी भाऊ हा दुसऱ्या पंजाबीला मिठी मारत असेल तर तो राजद्रोह कसा काय असू शकतो, असे त्यांनी म्हंटले होते. त्यावरून हा नवा वाद निर्माण झाला आहे.
नरेंद्र मोदी हे नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाला निमंत्रण नसताना भेटायला जातात. त्या प्रमाणेच सिद्धू आणि बाजवा यांनी एकमेकाला मिठी मारण्यात काहीच गैर नाही. सिद्धू यांनी बाजवा यांना मिठी मारणे हा देशद्रोह कसा असू शकतो, असे त्यांचे म्हणणे होते.
त्यावर बालुनी यांनी आक्षेप घेतला आहे. ते रावत यांना म्हणाले की, ” पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांचे हात भारताच्या शूर सैनिकांच्या रक्ताने माखले आहेत. त्यांना मिठ्या मारणे दुर्दैवी घटना आहे.” त्याहून दुर्दैवी बाब म्हणजे उत्तराखंड येथील प्रत्येक घरातील एक व्यक्ती सैन्यात असताना त्या राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांने सिद्धू आणि बाजवा यांच्या मिठीचे समर्थन करणे अत्यंत चुकीचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App