बंगाल विधानसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात ठराव मंजूर
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : Rohingya बंगालमधील रोहिंग्यांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजप खासदार समिक भट्टाचार्य यांनी राज्यातील ममता बॅनर्जी सरकारवर व्होटबँकेसाठी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.Rohingya
राज्यसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना भट्टाचार्य म्हणाले की, कोलकाता येथील राष्ट्रीय महत्त्व असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर फिजिक्सच्या बाहेरील मोठ्या जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्यात आला आहे. बांगलादेशातून अवैधरित्या आलेल्या रोहिंग्यांनी हा कब्जा केला आहे. या रोहिंग्यांनी राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण केला आहे कारण ही संस्था संवेदनशील आहे.
संस्थेच्या प्रमुखाने याबाबत पोलिस आणि जिल्हा प्रशासनाकडे चार वेळा तक्रार केल्याचा आरोप भट्टाचार्य यांनी केला. मात्र ममता सरकारला त्यांना हटवायचे नसल्याने जाणीवपूर्वक कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यावर सभागृहात उपस्थित तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ घातला. यावरून भाजपचे सदस्य राजकारण करत असल्याचे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App