‘ते फक्त धर्माचे राजकारण करतात, त्यांना जनतेची काळजी नाही’, कपिल सिब्बल यांचा भाजपवर हल्लाबोल


केंद्रातील मोदी सरकार असो वा उत्तर प्रदेशातील योगी सरकार असो, सरकारवर हल्लाबोल करण्याची एकही संधी काँग्रेस सोडू इच्छित नाही. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी भाजप नेत्यांची खिल्ली उडवली आहे. कपिल सिब्बल यांनी ट्विट करत भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. भाजपचे मंत्री उत्पन्न वाढले असे म्हणतात, पण लोकांचेच उत्पन्न वाढले नाही, असा टोला लगावत सिब्बल यांनी ट्विट केले आहे.BJP minister income increased not of public says Kapil Sibal


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार असो वा उत्तर प्रदेशातील योगी सरकार असो, सरकारवर हल्लाबोल करण्याची एकही संधी काँग्रेस सोडू इच्छित नाही. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी भाजप नेत्यांची खिल्ली उडवली आहे. कपिल सिब्बल यांनी ट्विट करत भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. भाजपचे मंत्री उत्पन्न वाढले असे म्हणतात, पण लोकांचेच उत्पन्न वाढले नाही, असा टोला लगावत सिब्बल यांनी ट्विट केले आहे.

सिब्बल म्हणाले, इंधन, एलपीजीचे दर वाढले आहेत. ते गरीब लोकांचा विचार करत नाहीत आणि केवळ धर्माचे राजकारण करतात. मला आशा आहे की लोक हे सरकार उलथून टाकतील आणि यूपी 2022 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव करून त्याची सुरुवात करतील.



शहा यांच्या दौऱ्यावर सिब्बल यांची टीका

अलीकडेच काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर टीका केली होती. यासोबतच त्यांनी उत्तर प्रदेशातील अल्पसंख्याकांना धोरणात्मकरीत्या लक्ष्य करणे बंद करण्याचे आवाहनही केले.सिब्बल यांनी ट्विट केले की “जम्मू आणि काश्मीरमध्ये अमित शाह यांनी ‘अल्पसंख्याकांच्या स्ट्रेटली प्लान्ड सिक्युरिटी’ची मागणी केली, चांगले केले! उत्तर प्रदेशातही तेच करा.

सिब्बल म्हणाले होते की अल्पसंख्याकांना नियोजितपणे लक्ष्य करणे थांबवा. जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱ्यात शाह म्हणाले होते की, जम्मू-काश्मीरच्या विकासात कोणीही अडथळा आणू शकत नाही आणि केंद्रशासित प्रदेशातील शांतता आणि सलोखा बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

प्रियांकांचा यूपीमध्ये सरकारवर हल्लाबोल

दुसरीकडे, प्रियंका गांधी आधीच काँग्रेससाठी हरवलेले मैदान शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रियंका यांनी गोरखपूरमध्ये प्रतिज्ञा रॅलीला संबोधित केले. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणाल्या की, कठीण काळात फक्त काँग्रेसच जनतेच्या पाठीशी उभी असते. मग हे सर्व पक्ष दिसतही नाहीत. प्रियांका गांधी यांनी सपा आणि बसपाला फटकारले आणि मी मरेन पण भाजपशी कधीच संबंध ठेवणार नाही, असे म्हटले आहे.

BJP minister income increased not of public says Kapil Sibal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात