विशेष प्रतिनिधी
कोलकता – पश्चिम बंगालमध्ये भाजप व तृणमुल कॉंग्रेस यांच्यातील कुरघोडीचे राजकारण थांबण्याचे चिन्हे अजूनही दिसत नाहीत. उत्तर २४ परगणा जिल्ह्यात पोलिसांनी अटक केल्याचा दावा केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी केला. मात्र, ठाकूर हे स्वत:च पोलिसांच्या वाहनात बसल्याचे सांगत पोलिसांनी हा दावा फेटाळला.BJP minister arrested in west Bengal
पश्चिम बंगालमध्ये भाजपने ‘शहीद सन्मान यात्रा’ सुरू केली असून, या यात्रेसाठी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बिराती येथे मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्ते जमले होते. ठाकूर या जिल्ह्यातील बोंगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते केंद्रात बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्री आहेत. पूजेला जात असताना पोलिसांनी अटक केल्याचा दावा त्यांनी केला.
मात्र, बेकायदेशीररीत्या एकत्र आल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना अटक केली होती. ठाकूर यावेळी स्वत:च पोलिसांच्या वाहनात येऊन बसले असा खुलासा पोलिसांनी केला. त्यावर बोलताना ठाकूर यांनी मी स्वत:हून अटक करवून घेतली असती तर माझ्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर इतर लोक का होते, असा सवाल केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App