वृत्तसंस्था
लखनौ :अफगाणिस्तानातील तालिबानी दहशतवाद्यांचे कौतुक करणाऱ्या धर्मांध नेत्यांना उत्तर प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी फटकारले आहे. BJP leader swatanta dev singh warns those who praise Taliban
समाजादी पार्टीचे खासदार शफीकुर रहमान बर्क आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी तालिबानी दहशतवाद्यांच्या बाजूनं वक्तव्य केलं होते. त्या दोघांना स्वातंत्र देव यांनी कडक शब्दात इशारा दिला.
स्वतंत्र देव म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशातील जे लोक दहशतवाद्यांची शुभचिंतक बनत आहेत, त्यांनी याद राखा की, देशाचे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत…’
बुधवारी मौलाना सज्जाद नोमानी यांनी तालिबानला विजयासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. नोमानी यांनी तालिबान्यांना सलामही केला. त्यापूर्वी सपा खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी तालिबानची तुलना भारतीय स्वातंत्र्य संग्रामाशी केली होती. बर्क यांच्या या वक्तव्यानंतर यूपी पोलिसांनी त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App