BJP leader Gulam Rasool Dar : जम्मू -काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी भाजप नेते गुलाम रसूल डार आणि त्यांच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. डार हे कुलगाममधून किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष होते आणि ते सरपंचही होते. जम्मू -काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले. दुसरीकडे भाजपनेही या हल्ल्याला भ्याड कृत्य म्हटले आहे. BJP leader Gulam Rasool Dar, his wife shot dead by terrorists in J&K’s Anantnag
विशेष प्रतिनिधी
अनंतनाग : जम्मू -काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी भाजप नेते गुलाम रसूल डार आणि त्यांच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. डार हे कुलगाममधून किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष होते आणि ते सरपंचही होते. जम्मू -काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले. दुसरीकडे भाजपनेही या हल्ल्याला भ्याड कृत्य म्हटले आहे.
अनंतनागमधील लाल चौकात दहशतवाद्यांनी डार आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार केला. यादरम्यान दोघांनाही गोळ्या लागल्या. हल्ल्यानंतर दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. जेथे दोघांचाही मृत्यू झाला.
जम्मू -काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, सरपंच रसूल डार आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. हे एक भ्याड कृत्य आहे. यातील गुन्हेगारांना लवकरच दंड होईल. या दु:खाच्या वेळी शोकसंतप्त कुटुंबाला माझ्या हार्दिक संवेदना.
भाजप नेते रवींद्र रैना म्हणाले, पाकिस्तानच्या भ्याड दहशतवाद्यांनी कुलगाममध्ये भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष गुलाम रसूल दार आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्याच्या मारेकऱ्यांना यासाठी कठोर शिक्षा होईल.
भाजप प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी कुलगाम भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गुलाम रसूल दार आणि त्यांच्या पत्नीच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी या दहशतवादी हल्ल्याला रानटी आणि भ्याडपणाचे म्हटले आहे. ठाकूर म्हणाले की, निष्पाप लोकांवर हल्ला करणे आणि हत्या करून काहीही होणार नाही, यातून दहशतवाद्यांची हतबलता दिसते. त्यांनी शोकाकुल कुटुंबाप्रति सहानुभूती व्यक्त केली आणि हल्लेखोरांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याचे पोलिसांना आवाहन केले.
BJP leader Gulam Rasool Dar, his wife shot dead by terrorists in J&K’s Anantnag
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App