नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ममता बँनर्जी यांना पराभूत करण्याचा पराक्रम करणाऱ्या भाजपाच्या सुवेंद्रू अधिकारी यांच्याबद्दलची ममतांची सूडभावना कमी होण्याची चिन्हे नाहीत. अत्यंत तालेवार, संपन्न जमीनदार घराण्यातल्या अधिकारी आणि त्यांच्या भावावर ममतांच्या सरकारने आपत्कालीन मदत साहित्याची चोरी केल्याचा ठपका ठेवला आहे. BJP leader and West Bengal opposition leader Suvendu Adhikari, brother booked for stealing relief material; Trinmool vengeance politics is on
वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते सुवेंद्रू अधिकारी यांच्या भावावर मदत साहित्याची चोरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे वर्चस्व असलेल्या कांथी नगरपालिकेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य रत्नदीप मन्ना यांनी अधिकारी यांच्या भावाविरोधात तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी सुवेंद्रू अधिकारी आणि त्यांचे भाऊ सोमेंदू या दोघांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
“29 मे 2021 च्या रात्री साडेबारा वाजता भाजपा नेते आणि आमदार सुवेंद्रू अधिकारी आणि त्यांचा भाऊ सोमेंदू यांच्या आदेशानुसार कांथी नगरपालिकेच्या गोडावूनमधील सरकारी मदतीचे साहित्य बेकायदेशीररित्या आणि जबरदस्तीने कुलुपे उघडून नेण्यात आले. या साहित्याची किंमत लाखो रुपये आहे.
सोमेंदू अधिकारी हे कांथीचे माजी नगराध्यक्ष आहेत,” अशी तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर भाजपाच्या नेत्यांनी या चोरीसाठी केंद्रीय सशस्त्र दलाची मदत घेतली असाही आरोप करण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे मात्र याच्या विपरीत आहे. केवळ राजकीय सूडबुद्धीतून केंद्र सरकारकडून आलेली मदत स्थानिक प्रशासन लोकांपर्यंत पोहोचवत नव्हते. वारंवार विनंत्या-अर्ज केल्यानंतरही प्रशासन स्थानिकांना दाद देत नव्हते.
मात्र गोडावूनमधले साहित्य कुलूपं उघडून कोणी घेऊन गेले असे घडलेले नाही. दरम्यान, सुवेंदू अधिकारी यांनी अद्याप या संदर्भात कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.
हेच सुवेंदू अधिकारी हे गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरपर्यंत ममता बॅनर्जी यांचे सर्वात जवळचे नेते होते. तृणमूल कॉंग्रेसमध्ये ममता यांच्यानंतर क्रमांक दोनचे नेतृत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. मात्र ममता यांच्या हेकेखोरपणाला आणि हुकुमशाहीला कंटाळून त्यांनी डिसेंबर 2020 मध्ये भाजपात प्रवेश केला. तेव्हापासून ते ममता बॅनर्जी यांचे लक्ष्य बनले आहेत.
एवढेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही सुवेंदू अधिकारी यांनी ममता बँनर्जी यांचा बाराशे मतांनी पराभव केला. तेव्हापासून तर ममता बँनर्जी अधिकारींचा सूड उगवण्याची संधी शोधत असतात असे सांगितले जाते.
वास्तविक अधिकारी हे नंदीग्राममधील मोठे प्रस्थ आहे. परंपरागत जमीनदार आणि श्रीमंत घराण्यातून येणारे अधिकारी सरकारी साहित्याची अफरातफर करण्याची शक्यता नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. राज्याचे प्रशासन ममता बॅनर्जींच्या दहशतीखाली काम करत असल्याने त्यांना गोवण्याचा प्रयत्न झाला असल्याची चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App