छतरपूरचे आमदार करतार सिंह तंवर आणि दिल्ली सरकारचे माजी मंत्री राज कुमार आनंद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. छतरपूरचे आमदार करतार सिंह तंवर आणि दिल्ली सरकारचे माजी मंत्री राज कुमार आनंद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही काळापूर्वी राज कुमार आनंद यांनी आम आदमी पार्टी सोडून बसपमध्ये प्रवेश केला होता. आता 10 जुलै रोजी राजकुमार आनंद पत्नी वीणा आनंदसोबत दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला.BJP gave shock to Aam Aamdi Party and Bahujan Samaj Party
रत्नेश गुप्ता, सचिन राय, माजी आमदार वीणा आनंद आणि आप नगरसेवक उमेद सिंग फोगट यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व नेत्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि अरुण सिंह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय हिमाचल प्रदेशातील आम आदमी पक्षाचे अनेक नेतेही भाजपमध्ये सामील झाले.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज कुमार आनंद म्हणाले की, केजरीवाल दलितांचा अपमान करतात, दलितांच्या भावनांचा कधीही आदर करत नाहीत, तीर्थयात्रा योजनेत दलितांचा सहभाग नाही. नवी दिल्लीतून बसपाच्या तिकीटावर निवडणूक लढवलेले राजकुमार आनंद हे मायावतींच्या पक्ष बसपशी इतके नाराज झाले होते की तीन महिन्यांतच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एप्रिलमध्ये राजकुमार आनंद यांनी पक्षातील भ्रष्टाचाराचे कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आम आदमी पक्षाचे प्रमुख भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करत नसल्याचा आरोप करत आनंद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी मायावतींच्या पक्षात प्रवेश केला होता.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज कुमार आनंद यांनी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला होता. यानंतर त्यांनी बसपा सोडण्याचा निर्णय घेतला. राज कुमार आनंद हे आम आदमी पक्षाचे पटेल नगरचे आमदार होते. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली मंत्रिमंडळात ते समाजकल्याण आणि एससी/एसटी मंत्री होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App