
नाशिक : एकेकाळी लोकसभेत फक्त 2 खासदार निवडून आलेल्या भाजपने देशभरात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशभरातले तब्बल 417 उमेदवार जाहीर केले. 101 विद्यमान खासदारांची तिकिटे कापली. वेगवेगळ्या 12 पक्षांमधून नेते आपल्या पक्षात खेचून घेऊन त्यांना उमेदवारी दिल्या. हे सगळे बिनबोभाट घडले. त्याविषयीच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या, तरी भाजपची नेमकी स्ट्रॅटेजी आणि नेते खेचून घेण्याचे टाइमिंग याविषयी कोणत्याही माध्यमातून अचूक भाकीत वर्तवता आले नाही. BJP declared 417 loksabha candidates but INDI INDI alliance chanakya sharad pawar falling short in declaring only 10 candidates of his own NCP
या पार्श्वभूमीवर INDI आघाडीच्या चाणक्यांना मात्र एका झटक्यात त्यांच्या वाट्याला आलेले केवळ 10 उमेदवार देखील एका झटक्यात जाहीर करता आलेले नाहीत. अजूनही ते “नवे डाव”, ‘नव्या खेळ्या” रंगवतच राहिले आहेत. त्यात चाणक्यांनी साताऱ्यात जाऊन कॉलर उडवून पाहिली, पण साताऱ्यातल्या उमेदवार मात्र त्यांना अजून जाहीर करता आलेला नाही. साताऱ्यातून शशिकांत शिंदे किंवा सुनील माने किंवा अन्य कोणी “फिट” नसल्याने शेवटी त्या मतदारसंघाची उमेदवारी पृथ्वीराज चव्हाण यांच्या गळ्यात घालण्याचे घाटत आहे.
माढा मतदारसंघात देखील INDI आघाडीचे चाणक्य अजूनही चाचपडतच आहेत. भाजपने माढ्यातून रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर तिथे मोहिते पाटील घराणे “नाराज” असल्याच्या बातम्या आल्या मोहिते पाटलांनी चाणक्यांची भेट देखील घेतली, पण अजूनही माढ्यातून उतरण्याची म्हणजेच भाजप विरोधात जाण्याची मोहिते पाटलांची हिंमत होत नाही. त्यामुळे चाणक्यांना माढ्यातून नवा डाव टाकण्याची वेळ आली आणि तो नवा डाव ते संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवीण गायकवाड यांच्यावर टाकणार असल्याची बातमी समोर आली आहे.
चाणक्यांनी जाहीर केलेल्या 5 उमेदवारांपैकी 3 उमेदवार तर ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात असेच आहेत. बीडमधून बजरंग सोनवणे, नगर मधून निलेश लंके हे वाटीतून ताटात आले आहेत. म्हणजेच अजितदादांच्या राष्ट्रवादीतून चाणक्याच्या राष्ट्रवादीत आले आहेत. सुप्रिया सुळे यांची उमेदवारी तर घरचीच आहे. या उमेदवाऱ्या जाहीर करूनही चाणक्यांचा 10 चा कोटा अद्याप पूर्ण झालेला नाही.
वास्तविक 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये एकत्रितरित्या उमेदवार जाहीर करणे ही काही फार मोठी तीर मारण्यासारखी बाब नव्हे, पण तितकी साधी बाब देखील INDI आघाडीच्या चाणक्यांना वेळेत पूर्ण करता आलेली नाही, तरीही चाणक्यांची “नवे डाव”, “नव्या खेळ्या” सुरूच आहेत. पण असले डाव खेळत राहणे आणि ताटातलं वाटीत आणि ताटातलं वाटीत करावे लागणे ही त्यांच्या चाणक्यगिरीची खरी मर्यादा आहे.
तिकडे उद्धव ठाकरे यांनी 17 उमेदवारांची यादी पहिल्याच झटक्यात जाहीर केली. काँग्रेसने देखील 14 उमेदवार जाहीर करून टाकले, पण चाणक्य मात्र अजून 5 उमेदवारच जाहीर करून पुढचे 5 उमेदवार जाहीर करताना अडखळले आहेत.
BJP declared 417 loksabha candidates but INDI INDI alliance chanakya sharad pawar falling short in declaring only 10 candidates of his own NCP
महत्वाच्या बातम्या
- पवार दक्षिण महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या प्रभावाखालच्या लोकसभेच्या जागा काँग्रेस – शिवसेनेसाठी का सोडून देत आहेत??, त्यांचा हेतू नेमका
- काँग्रेसला इन्कम टॅक्सच्या नोटीशींवर नोटीशी; पक्षाची थकबाकी नेमकी आहे तरी किती??
- भारताची बदनामी करून ते आज लोकशाही नष्ट करत आहेत…
- उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकासाठी नव्या युतीमुळे वाढणार अखिलेश यादव यांच्या अडचणी!