कैसरगंजमधून भाजपचा उमेदवार जाहीर, ब्रिजभूषण यांचा पत्ता कट, जाणून घ्या कोणाला मिळाले तिकीट?

गेल्या वर्षभरात महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांमुळे ब्रिजभूषण शरण सिंह बरेच वादात सापडले आहेत


विशेष प्रतिनिधी

कैसरगंज : उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान होण्यापूर्वीच भाजपाने ७३ जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली होती. मात्र आता भाजपने उर्वरित दोन जागांपैकी एका जागेवर उमेदवाराचे नाव जाहीर केली आहेत. भाजपने कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून ब्रिजभूषण शरण सिंह यांना उमेदवारी नाकारात त्यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना उमेदवारी दिली आहे.BJP candidate declared from Kaiserganj, Brij Bhushan rejected, know who got the candidature

या जागेवर भाजपचे ब्रिजभूषण शरण सिंह सध्या खासदार आहेत. मात्र, गेल्या वर्षभरात महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांमुळे ते बरेच वादात सापडले आहेत. मात्र हा परिसर त्यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि गेल्या 30 वर्षांपासून येथे त्यांचे वर्चस्व दिसून आले आहे.



भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल आहे. हा खटला दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टात सुरू आहे. गेल्या वर्षीच भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी या खेळाशी संबंध तोडल्याचे सांगितले होते.

त्यानंतर, गेल्या वर्षीच्या सुरुवातीला, बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्यासह इतर कुस्तीपटूंनी जंतरमंतर येथे ब्रिजभूषण शरणसिंग यांच्या विरोधात निषेध केला होता, त्यांनी अनेक तरुण कनिष्ठ कुस्तीपटूंचा छळ केल्याचा आरोप केला होता.

BJP candidate declared from Kaiserganj, Brij Bhushan rejected, know who got the candidature

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात