दिल्लीत मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपकडून रविशंकर प्रसाद, ओमप्रकाश धनखड यांची निरीक्षक पदी नियुक्ती!!

Ravi Shankar Prasad

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीत मुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीसाठी भाजपने माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि ओमप्रकाश धनखड यांची आज दुपारी निरीक्षक पदी नियुक्ती केली. दिल्ली भाजप विधिमंडळ पक्षाची आज सायंकाळी सात वाजता बैठक होणार असून या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेते पदाची निवड होणार आहे त्यासाठी रविशंकर प्रसाद आणि ओमप्रकाश धनखड भाजपचे केंद्रीय निरीक्षक हजर राहतील. हे दोन्ही नेते सर्व आमदारांशी चर्चा करून नव्या नेत्याची निवड करतील.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा पराभव करून भाजपने 48 जागा जिंकल्या. त्यामुळे उद्या भाजपचे बहुमताचे सरकार स्थापन होणार आहे उद्या दुपारी १२.४५ वाजता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा रामलीला मैदानावर शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह अनेक केंद्रीय मंत्री अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असून त्याआधी भाजपा विधिमंडळ नेत्याची निवड आज सायंकाळी ७.०० वाजता होणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री पदासाठी प्रवेश वर्मा, विजेंद्र गुप्ता, मनोज तिवारी, रेखा गुप्ता आदी नेत्यांची नावे माध्यमांच्या चर्चेत आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे ट्रॅक रेकॉर्ड बघता दिल्लीला यापेक्षा वेगळा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी मिळू शकतो, अशी देखील दबक्या आवाजात चर्चा आहे.

BJP appoints Ravi Shankar Prasad, Omprakash Dhankhar as observers to elect Chief Minister in Delhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात