बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांची १९८७ मध्ये पहिल्यांदा भेट झाली. त्यावेळी मेलिंडा मायक्रोसॉफ्टमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करत होत्या.
१९९४ मध्ये या दोघांनी हवाईच्या लानी बेटावर लग्न केले होते. असं म्हणतात की, तेथील गर्दी कमी करण्यासाठी त्यांनी बरीच हेलिकॉप्टर भाडे तत्वावर घेतली होती. Bill and Melinda Gates divorce after 27 years of marriage
विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा या दोघांनी घटस्फोट घेत असल्याचे मंगळवारी जाहीर केले. जगभरातील बहुचर्चित व्यक्तिमत्त्वांपैकी एक असणाऱ्या बिल गेट् आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनाचा प्रवास आता इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन ही जगातील सर्वात मोठी खासगी चॅरिटेबल संस्था ते चालवतात आणि यासाठी ते यापुढेही एकत्र काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
After 27 years, Bill Gates and Melinda Gates have decided to end their marriage. "We have made the decision to end our marriage, we no longer believe we can grow together as a couple in this next phase of our lives," Bill Gates and Melinda Gates said in a statement. pic.twitter.com/bPWZKSMETS — ANI (@ANI) May 3, 2021
After 27 years, Bill Gates and Melinda Gates have decided to end their marriage.
"We have made the decision to end our marriage, we no longer believe we can grow together as a couple in this next phase of our lives," Bill Gates and Melinda Gates said in a statement. pic.twitter.com/bPWZKSMETS
— ANI (@ANI) May 3, 2021
सध्याच्या घडीला या दोघांनीही परस्पर सहमतीनं हा निर्णय घेतला आहे. बिल गेट्स यांनी ट्विट करत लिहिलं, ‘आम्ही आमच्या नात्याबाबत फार विचार केला. अखेरीस हे नातं इथंच थांबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
जीवनाच्या या पुढच्या टप्प्यावर आम्ही एकत्र पुढे जाऊ शकू याचा आम्हाला फारसा विश्वास नाही. आता आम्हा दोघांनाही आपआपला वेगळा असा वेळ हवा आहे. आम्ही जीवनाच्या नव्या टप्प्याच्या दिशेनं जाऊ इच्छितो’.
खूप चर्चा आणि नात्यासंबंधी विचार केल्यानंतर आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या २७ वर्षात तीन मुलांचं संगोपन करत त्यांना मोठं केलं. तसेच जगभरातील लोकांना निरोगी आणि चांगलं आयुष्य जगता यावं, अशा संस्थेचीही स्थापना केली.
pic.twitter.com/fCVHDlZbvq — Melinda French Gates (@melindagates) May 3, 2021
pic.twitter.com/fCVHDlZbvq
— Melinda French Gates (@melindagates) May 3, 2021
जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या बिल गेट्स यांच्या या निर्णयानंतर आता त्यांच्या आर्थिक आणि व्यावसायित गोष्टींचाही या नात्यावर काही परिणाम होणार आहे का याबाबतच्या निर्णयाची अद्याप स्पष्टोक्ती करण्यात आलेली नाही.
pic.twitter.com/padmHSgWGc — Bill Gates (@BillGates) May 3, 2021
pic.twitter.com/padmHSgWGc
— Bill Gates (@BillGates) May 3, 2021
सामाजिक कार्य
साथीच्या आजारांनी त्रस्त मुलांच्या आरोग्यावर, लसीकरणासाठी या संस्थेने पुढाकार घेऊन कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.
गिव्हिंग प्लेज सुरू करण्यात बिल-मेलिंडा गेट्स आणि वॉरेन बफे यांचा पुढाकार होता. गिव्हिंग प्लेज म्हणजे उद्योगपतींकडून सामाजिक कार्यासाठी पैशाच्या रुपात दिलं जाणारं भरीव योगदान.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App